आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरो कप : जर्मनीची सेमीत धडक!, थरारक पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीवर ६-५ ने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरडियोक्स (फ्रान्स) - अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या क्वार्टर फायनल सामन्यात जर्मनीने इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-५ ने पराभूत करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. निर्धारित वेळेपर्यंत सामना १-१ ने बरोबरीत होता. अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल लागला नाही. यामुळे पेनल्टी शूटआऊटवर विजेत्याचा निकाल लागला. सेमीफायनलमध्ये यजमान फ्रान्स आणि आइसलँड यांच्यातील विजेत्याशी जर्मनीचा सामना होईल.

एकूण १८ पेनल्टीपर्यंत चाललेल्या मॅरेथाॅन शूटआऊटमध्ये जर्मनीच्या खेळाडूंची बाजू अखेर वरचढ ठरली. जर्मनीने एकूण सहा गोल अचूक करून बाजी मारली, तर इटलीला पाच गोल करता आले. जर्मनीकडून जोनास हेक्टरने विजयी गोल केला.

शूटआऊट झाला रोमांचक
शूटआऊटमध्ये पहिल्या पेनल्टीपैकी दोन्ही संघ २-२ ने बरोबरीत होते. जर्मनीकडून क्रूस आणि ड्रॅक्सलर यांनी गोल केला, तर थॉमस मूलर, मेसूत ओजिल आणि श्वेन्सटायगर यांनी चेंडू गोलपोस्टबाहेर मारला. यानंतर दोन्ही संघांना आणखी प्रत्येकी ३ पेनल्टीची संधी मिळाली आणि स्कोअर ५-५ असा बरोबरीत झाला. इटलीच्या डारमियानला पुढच्या पेनल्टीला जर्मन गोलकीपर मॅनुएल नुएरने रोखले. जर्मनीच्या जोनास हेक्टरने विजयी गोल करून इटलीला बाहेरचा रस्ता दाखवला. विजयासह जर्मनीचे खेळाडू तसेच स्टेडियमबाहेर असलेल्या चाहत्यांनी जल्लोष केला.

पहिला गोल ओजिलने केला
जर्मनीसाठी मेसूत ओजिलने पहिला गोल ६५ व्या मिनिटाला केला. त्याने मारिया गोमेजच्या शानदार पासवर जबरदस्त गोल करून जर्मनीला आघाडी मिळवून दिली.

इटलीच्या कोचचा राजीनामा
इटलीचे कोच अँटोनिओ कोंटे यांनी जर्मनीकडून शूटआऊटमध्ये झालेल्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोंटे म्हणाले, ‘हा खूपच कठीण सामना होता. आम्ही या सामन्यात सर्व अडचणींना दूर करताना विजयासाठी जोरदार प्रयत्न केले.’

आम्ही चुकलो
आमच्या संघात शानदार पेनल्टी तज्ज्ञ खेळाडू आहेत. मात्र, आम्ही आज चुकलो. युवांनी जबाबदारी पार पाडली. हेक्टर, किमिच यांनी चांगली कामगिरी केली.
- जोआशिम लिओ, जर्मनी संघाचे कोच.

थरारक सामना
मी अशा पेनल्टीचा कधीच अनुभव घेतला नाही. त्यांनी किती मारले हे लक्षात नाही, मात्र बहुतेक शॉट मधोमध मारले. मी अखेरचा शॉट रोखला.
- मॅनुएल नुएर, जर्मनीचा गोलकीपर.
बातम्या आणखी आहेत...