आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांनी जर्मनीला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या गोएत्जाचे स्नायू होत आहेत कमकुवत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉर्टमंड - फुटबॉल वर्ल्डकप २०१४ च्या फायनलमध्ये गोल करून जर्मनीला चॅम्पियन बनवणारा मारियो गोएत्जा बहुदा आता पुन्हा खेळू शकणार नाही. २४ वर्षांनी विश्वचषक जिंकून देणारा जर्मनीचा हीरो गोएत्जाला एक गंभीर आजार झाला असून मेटाबोलिक डिसऑर्डर असे त्याचे नाव आहे. या आजारात शरीरातील स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते. स्नायू कमकुवत होत जातात. डॉक्टरांनी त्याला तत्काळ खेळणे थांबवण्यास सांगितले असून भविष्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्याचा क्लब बोरुसिया डॉर्टमंडने एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करून म्हटले की, ‘२४  वर्षीय गोएत्जा अनिश्चित काळासाठी खेळू शकणार नाही. तो मागच्या काही महिन्यांत खूप वेळा जखमी झाला. चयापचय विकारामुळे (मेटाबोलिक डिसऑर्डर)त्याची क्षमता कमी झाली. गोएत्जाने गतवर्षीच क्लबसोबत करार केला होता. करार केल्यानंतर त्याचे प्रदर्शन सातत्याने घसरत गेले.’ याआधी बायर्न म्युनिच क्लबसाठीसुद्धा तो विशेष प्रदर्शन करू शकला नव्हता. यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळणे कठीण झाले होते.  तेथेसुद्धा वारंवार जखमी झाल्याने त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. अनेक तपासण्यांनंतर आजाराचे निदान झाले.  

लिव्हरपूल गोएत्जला करारबद्ध करण्यात रुची दाखवत होती. मात्र, त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर आता लिव्हरपूलसोबत कराराची शक्यता मावळली आहे. गोएत्जाचा समावेश प्रतिभावंत खेळाडूंत होते. २०१० मध्ये जर्मन फुटबॉल संघटनेचे तत्कालीन तांत्रिक संचालक माथियास सॅमर यांनी त्याला सर्वात गुणवंत खेळाडू बनशील, असे भाकीत केले होते. यानंतर वर्ल्डकपमध्ये गोल करून त्याने सॅमर यांचे शब्द खरे ठरवले. गोएत्जाने सोशल मीडियावर लिहिले की, ‘डॉक्टरांनी मला खेळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मी हार मानणाऱ्यांपैकी नाही.’

६ वर्षांत दुखापतीमुळे गमावले ३९ सामने  
२०११ मध्ये १० वेगवेगळ्या स्नायूंच्या दुखापतीमुळे गोएत्जाने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सामन्यांसह एकूण ३९ सामने गमावले. या सामन्यातून त्याला बाहेर व्हावे लागेल. डॉर्टमंडसाठी त्याने १६ सामन्यांत केवळ २ गोल केले होते.
बातम्या आणखी आहेत...