आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gianni Infantino Wins FIFA Presidential Election

गियानी फिफाचे नवे अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - स्वित्झर्लंडचे गियानी इनफेंटिना यांची जागतिक फुटबॉल संघटनेच्या (फिफा) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी शुक्रवारी दुसऱ्या फेरीच्या मतदानात बहरिनचे शेख सलमान बिन अब्राहम अल खलिफा यांना २७ मतांनी पराभूत केले. गियानी यांना २०७ पैकी ११५ मते मिळाली, तर शेख सलमान यांना ८८ मते मिळाली. शेख सलमान ८८ मतांसह दुसऱ्या स्थानी आले.

४५ वर्षीय गियानी युरोपियन फुटबॉल महासंघाचे महासचिवसुद्धा आहेत. ते सॅप ब्लाटर यांच्या जागी फिफाच्या अध्यक्षपदाची खुर्ची सांभाळतील. ब्लाटर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर बंदीची शिक्षा भोगत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी झुरिच येथे अध्यक्षपदासाठी मतदान झाले. यात फिफाच्या २०७ सदस्य देशांनी मतदान केले. फिफा अध्यक्षपदाच्या शर्यतीत गियानी आणि शेख सलमान यांच्याशिवाय तीन आणखी सदस्य होते. मात्र, त्यांना मतदारांचे समर्थन मिळाले नाही. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसैन यांनी केवळ ३ मते मिळाली, तर फ्रान्सचे जेरोम शेंपेन आणि द. आफ्रिकेचे टोकियो सेक्सवाले यांना एकही मत मिळाले नाही.

रणनीतीसाठी १५ मिनिटांचा वेळ
मतदानाच्या आधी सर्व पाच उमेदवारांना आपापली रणनीती ठरवण्यासाठी प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. भविष्यात फिफाला कसे चालवणार, भ्रष्टाचाराशी दोनहात कसे करणार, फिफाची प्रतिमा कशी सुधारणार यावरच पाचही उमेदवारांनी भाषणे केली. यानंतर मतदान झाले.