पानीपत (हरियाणा)- हरियाणात मुलीला आईच्या गर्भातच ठार मारण्याची अनेक वर्षांपासून अलिखित परंपरा आहे. येथील स्त्री-पुरुषांचे प्रमाण अत्यंत विदारक आहे. यावरुन हरियाणात स्त्रीला किती कमी लेखले जाते हे दिसून येते. असे असतानाही संघर्षावर मात करीत येथील मुली स्वःबळावर मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी देश-विदेशात हरियाणाची ओळख प्रस्थापित केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा मुलींची माहिती देणार आहोत.
ताशी- नुंग्शी
ताशी आणि नुंग्शी या जुळ्या बहिणी असून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. दोघांनी प्रथम घरातच संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यांच्या वडीलांनी शिकवले होते, की मुले खास असतात. मुलींना समाजात दुय्यम स्थान आहे. पण तरीही दोघींनी वडीलांना विरोध केला नाही. त्यांचे मनपरिवर्तन घडवून आणले. त्यानंतर वडीलांना कधी दोघींना रोखले नाही. आता दोघी नावाजलेल्या ट्रेकर आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, श्वेताने शुटिंगमध्ये कमविले नाव... जिंकले अनेक मेडल्स...