आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्काेच्या गाेलने सुपर कप; दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेऊन माद्रिदची मिलानच्या कामगिरीशी बराेबरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्काेपजे- स्पेनच्या अांतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू इस्काेने  (५२ वा मि.) केलेल्या मॅजिक गाेलच्या बळावर िरअल माद्रिदने युराेपियन सुपर चषक पटकावला. गत चॅम्पियन माद्रिदने फायनलमध्ये इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडचा पराभव केला. स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह माद्रिद क्लब सलग दुसऱ्यांदा व एकूण चौथ्यांदा मानकरी ठरला. यापूर्वी माद्रिदने गतवर्षी २०१६ मध्येही सुपर कप पटकावला हाेता. यादरम्यान माद्रिदने फायनलमध्ये सेव्हिलाचा पराभव केला हाेता.  

इस्काे, केसमिराे हीराे  
माद्रिदच्या विजयामध्ये स्पेनचा इस्काे व ब्राझीलचा केसमिराे  हीराे ठरले. त्यांनी केलेल्या प्रत्येकी एका गाेलच्या बळावर माद्रिदने सामना जिंकला. केसमिराेने २४ व्या मिनिटाला माद्रिदला १-० ने अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला इस्काेने केलेल्या गाेलच्या बळावर माद्रिदने सामना जिंकला. इस्काेचा यंदा हा दहावा अांतरराष्ट्रीय गाेल ठरला.   

एसी मिलानच्या नावे सलग दाेन किताब 
सलग दुसऱ्यांदा सुपर कप जिंकून रिअल माद्रिदने एसी मिलानच्या १९९० मधील कामगिरीशी बराेबरी साधली. यापूर्वी १९९० मध्ये मिलानने सलग दाेन वेळा या स्पर्धेचा कप पटकावला हाेता. त्यानंतर अाता २०१७ मध्ये माद्रिदने ही कामगिरी केली.
बातम्या आणखी आहेत...