आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: चॅरिटीसाठी गीतकार झाला गाेल्फपटू जस्टिन !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सुरुवातीला खेळाडूंना केवळ मैदानावर खेळण्यामध्येच रुची असायची. ते इतर काेणत्याही गाेष्टीत कधीही रस दाखवत नव्हते. रात्रंदिवस खेळातील अापला दर्जा उंचावण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. सामाजिक संस्थेच्या अार्थिक मदतीसाठी हे खेळाडू एखाद्या सामन्याचे अायाेजन करायचे अाणि त्यातून जमा हाेणारी रक्कम ही संस्थेला दिली जायची.
मात्र, असे काहीही राहिलेले नाही. खेळाडू अाता खेळाशिवाय इतर गाेष्टींमध्येही अधिक अावड असल्याचे दाखवून देत अाहे. या सर्व खेळाडूंची अाता सामाजिक संस्थेला अार्थिक मदत करण्याची कार्यप्रणाली पूर्णत: बदलली अाहे. अाता इंग्लंडचा गाेल्फपटू जस्टिन राेसचेच उदाहरण घ्या. ताे सध्या संगीत क्षेत्रात अापले नशीब अाजमावत अाहे. संगीतामध्ये अावड असलेला ताे काही पहिला खेळाडू नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मर्सिडीझचा ब्रिटिश एफ-१ रेसर लुईस हॅमिल्टनने अापल्या मैत्रिणीसाठी गीत लिहिले अाहे. मात्र, जस्टिन राेस हा चॅरिटीसाठी गीतलेखन करत अाहे.

३५ वर्षीय जस्टिन राेस हा अायर्लंडच्या गीतकार-संगीतकार नियाल हाेरानसाेबत एक वेगळा अल्बम तयार करत अाहे. या अल्बमचे अनावरण मे महिन्यात हाेणार अाहे. या दाेघांच्याही फाउंडेशनने गीताच्या माध्यमातून चॅरिटीसाठी माेठ्या संख्येत पैसे जमा करण्यास कंबर कसणार अाहे.

जस्टिन अाणि हाेरान यांची भेट नुकतीच अमेरिकेतील अगस्ता मास्टर्स गाेल्फ स्पर्धेदरम्यान झाली. अमेरिकेचा गायक जस्टिन टिंबरलेकदेखील या वेळी उपस्थित हाेता. या भेटीदरम्यानही जस्टिन अाणि हाेरान यांच्यात अागामी अल्बमबद्दलच चर्चा झाली. अाता गायक हाेरानलाही गाेल्फ खेळण्यासाठीची अावड निर्माण झाली अाहे. यासाठी त्याला अायर्लंडचा अव्वल गाेल्फपटू राॅरी मॅक्लराॅयचे खास मार्गदर्शन मिळत अाहे. तसेच जस्टिन राेसने अगस्ता मास्टर्स गाेल्फ स्पर्धेत दहाव्या स्थानावर धडक मारली.

अद्याप राेसच्या गाण्याचे बाेल काय अाहेत, याची काेणत्याही प्रकारची माहिती नाही. कदाचित या गीताची थीमच ही गाेल्फवर असण्याची शक्यता अाहे. हे गीत लवकरच पूर्ण हाेण्याची अाशा अाहे. तसेच ते चाहत्यांच्याही पंसतीला पडेल, असा राेसला विश्वास अाहे. कारण, याला दिग्गज गायकांचा अावाज लाभणार अाहे. यासाठीच्या पूर्व तयारीचे छायाचित्र राेसने नुकतेच साेशल मीडियावर पाेस्ट केले. यात राेस काही तरी लिहित असल्याचे व हाेरान पियानाे वाजवत असल्याचे छायाचित्रात दिसत अाहे.
बातम्या आणखी आहेत...