आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांची गर्भवती, तरीही खेळते गाेल्फ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅम्पशायर - सहा महिन्यांंची गर्भवती असणाऱ्या अनेक नाेकरी करणाऱ्या महिला या मॅटर्निटी सुटीवर जाण्याच्या बेतात असतात. मात्र, हॅम्पशायरची लिज यंगने सर्वात माेठ्या गाेल्फ स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला. ती रिकाेह ब्रिटिश अाेपन गाेल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरली अाहे. ही स्पर्धा अागामी जुलै महिन्यात वाेबर्न गाेल्फ क्लबवर अायाेजित करण्यात अाली. यादरम्यान लिज ही सात महिन्यांची गर्भवती असेल. अशा गर्भावस्थेत खेळण्याचा शारीरिक अाणि मानसिकदृष्ट्या माेठा फायदा हाेत असल्याचे तिला मित्रांनी सांगितले. यातूनच तिला गाेल्फमधील अापली लय कायम ठेवता अाली.

‘सुरुवातीचे काही दिवस हे फार कठीण रािहले. तरीही मी अाॅस्ट्रेलिया, चीन, न्यूझीलंड येथील माेठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी हाेऊ लागले. यादरम्यान, मला नेहमी थकल्यासारखे वाटायचे. माझे शरीरही स्थूल हाेऊ लागले हाेते. त्यामुळे गाेल्फला साेडण्याचा मी विचार करत हाेते. यादरम्यान मी गर्भात वाढत असलेल्या बाळाचा विचार करायला सुरुवात केली. मात्र, अापल्या बाळाच्या भविष्याचा विचारही मी केला अाणि यातूनच अागामी काळातही मी गाेल्फ खेळणे फायदेशीर ठरणार असल्याचे माझ्या लक्षात अाले. त्यासाठी मी मनाची तयारी केली. तसेच अावश्यक असणारा फिटनेसही कायम ठेवला. हे सर्व काही करताना मला माझ्या मित्रांचे मानसिक पाठबळ मला सातत्याने मिळत गेले. याचाच फायदा मला अात्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी झाला. यातून मला कधीही खेळताना काेणत्याही प्रकारचा गंभीर त्रासही जाणवला नाही. अनेक महिला गर्भवती असताना अारामावर भर देतात. मात्र, मी बाळ अाणि माझ्या अाराेग्याचा विचार करूनच गाेल्फ खेळण्याकडे लक्ष्य केंद्रित केले,’ असेही लिज म्हणाली.

लिजने चेक गणराज्य येथील टिपस्पाेर्ट््स मास्टर्स स्पर्धेत अव्वल कामगिरी केली.त्यामुळे तिला ब्रिटिश अाेपन गाेल्फ स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. या स्पर्धेत अनेक मातांंनी सहभाग घेतला. मात्र, गर्भवती असताना सहभागी हाेणारी लिज ही एकमेव महिला गाेल्फपटू ठरली.
बातम्या आणखी आहेत...