आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Against PT Teacher Association At Aurangabad

‘त्या’ निर्णयाविरोधात क्रीडा संघटकांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शारीरिक शिक्षकांना अतिरिक्त ठरवत राज्य शासनाने क्रीडा शिक्षकांना शाळेतून हद्दपार करण्याचा घाट घातला आहे. क्रीडा शिक्षकांच्या जागी फुकटात काम करणाऱ्या अतिथी शिक्षक नेमण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला. केंद्र शासन आणि राज्य सरकार आपल्याच क्रीडा धोरण्याच्या विरुद्ध निर्णय घेऊन स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली.

सरकारने हा निर्णय आठ दिवसांत मागे न घेतल्या आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ.प्रदीप दुबे यांनी सांगितले. "दिव्य मराठी'ने "क्रीडा शिक्षकांना अतिरिक्त ठरवत हद्दपार करण्याचा घाट' या मथळ्याखाली सरकारचा क्रीडा क्षेत्रासाठी मारक असलेला निर्णयाची बातमी प्रकाशित केली. त्याला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन एमएसएममध्ये झालेल्या बैठकीत या निर्णयाचा विरोध केला. या वेळी २५० क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, संघटक, खेळाडू विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

राज्य सरकार एकीकडे क्रीडा विकास, क्रीडा गुण, योगाचा अभ्यासक्रमात समावेश, क्रीडा अभ्यासक्रम शिकवण्याची भाष करते. राज्याच्या क्रीडा धोरणात क्रीडा शिक्षण व खेळ याला महत्त्व देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नमूद करते. दुसरीकडे क्रीडा क्षेत्राला मारक असलेला निर्णय घेत आहे. याविरोधात पुढील आंदोलनाची लवकरच दिशा ठरवण्यात येणार असल्याचे दुबे यांनी म्हटले.

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पर्वत कासुरे, डॉ. मकरंद जोशी, डॉ. मीनाक्षी मुलियार, प्रा. रणजित पवार, डॉ.संदीप जगताप, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. मकसूद हाश्मी, प्रा. सचिन देशमुख, प्रा. सीमा मुंढे, डॉ. विशाल देशपांडे आदींची उपस्थिती होती.

आंदोलनाला पाठिंबा
राज्याच्या क्रीडा धोरणात दिलेल्या गोष्टी बाजूला करत वेगळ्या हेतूने क्रीडा शिक्षण व खेळावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप दुबे यांनी केला. आता मैदानात नाही तर बाैद्धिक पातळीवर सरकारविरोधी लढाई करण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी सज्ज राहा, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी जिल्हा शारीरिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष सुरेश मिरकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सर्वांना एकत्र आणण्याचे आश्वासन दिले.