आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grandmaster Viswanathan Anand At Nagpur, Divya Marathi

निवृत्तीच्या शक्यतेला आनंदकडून चेकमेट; नागपुरात बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बुद्धिबळाचा खेळ हा माझ्यासाठी प्राण आहे. वयाच्या पन्नाशीतही मी या खेळाचा संपूर्ण आनंद घेत असल्याने सध्या तरी निवृत्तीचा कुठलाही विचार माझ्या मनात डोकावला नसल्याचे माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने नागपुरात बोलताना स्पष्ट केले.

नागपुरात अखिल भारतीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद््घाटनासाठी आनंद नागपुरात आला होता. या वेळी निवृत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्याने तूर्तास निवृत्तीची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळली. आनंद म्हणाला, प्रत्येकालाच शेवटी कुठे तरी थांबावे लागते. त्याला मीदेखील अपवाद नसणार. मात्र, सध्या तरी त्याबाबत विचार केलेला नाही. वयाच्या पन्नाशीतही या खेळाचा मी आनंद घेतोय. शारीरिक मानसिक फिटनेससोबतच कामगिरीही समाधानकारक होत आहे.

भवितव्य उज्ज्वल
देशात गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. युवा चमकदार कामगिरी करत आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीत ते माघारत असले तरी येत्या काळात भवितव्य उज्ज्वलच आहे, असे, तोडीचा बुद्धिबळपटू अद्यापही तयार होऊ शकला नाही, याकडे लक्ष वेधले असताना आनंद म्हणाला.