आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया - हिंगीसची उपांत्य फेरीत धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वांगझू- अमेरिकन ओपन चॅम्पियन सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने आपली विजयी मोहीम अबाधित ठेवताना गुरुवारी ग्वांगझू ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या अव्वल मानांकित जोडीने स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत एकतर्फी विजयाची नोंद केली. या जोडीने लढतीत जर्मनीची अॅना लेना आणि रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कुचा पराभव केला. सानिया आणि हिंगीसने ६-२, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह ही जोडी अंतिम चारमध्ये दाखल झाली.

अमेरिकन ओपनच्या किताबाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या सानिया अाणि मार्टिना हिंगीसने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. त्यामुळे त्यांना ६-२ अशा फरकाने पहिला सेट जिंकला. यासह त्यांनी लढतीत आघाडी मिळवली. दरम्यान, जर्मनी-रोमानियाच्या जोडीने अव्वल मानांकित जोडीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले नाही. त्यानंतर सानिया-हिंगीसने अापला दबदबा कायम ठेवताना दुसऱ्या सेटमध्येही बाजी मारली. या जोडीने ६-३ ने दुसरा सेट जिंकून सामना आपल्या नावे केला. पराभवासह अॅना आणि मोनिकाला बाहेर पडावे लागले.

हालेपचा पराभव; साराची आगेकूच
महिला एकेरीत सिमोना हालेपला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे इटलीच्या सारा इराणीने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अल्लेर्टोवाने रंगतदार लढतीत सिमोना हालेपचा पराभव केला. तिने सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-३ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या वेळी सिमोना हालेपला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. तसेच जेलेना जांकोविकने अंतिम चारमध्ये धडक मारली. तिने अंतिम आठच्या लढतीत कुज्नेत्सोवाला ६-२, ७-५ अशा फरकाने पराभूत करून आगेकूच कायम ठेवली.