आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1930 मध्ये असे चालायचे जिम्नॅस्टीक, समोर आले OLD PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो ऑलिम्पिक 5 सप्टेंबरपासून रिओ दी जेनेरियोमध्ये सुरू होत आहे. खेळांचा हा कुंभमेळा 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात 28 गेम्सचे वेगवेगळे 206 इव्हेंट्स होणार आहेत. त्यात एक खास इव्हेंट म्हणजे जिम्नॅस्टीक. एका साइटने नुकतेच 1930 च्या दरम्यानचे ऑस्ट्रेलियन जिम्नॅस्टचे फोटो जारी केले आहेत. त्यात जिम्नॅस्टचे बॅलेंस आणि मुव्हज पाहायला मिळतील.

86 वर्षांपूर्वीचे ग्लॅमरस जिम्नॅस्ट
- जिम्नॅस्टीक हा खेळ सुरुवातीपासूनच ग्लॅमरस राहिला आहे हे 86 वर्षांपूर्वीचे फोटो पाहून लक्षात येते.
- 1915 च्या दरम्यान हे खेळ पुरुष आणि महिलांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
- जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्पेन अशा देशांमध्ये महिला बीचवर याचा सराव करताना पाहायला मिळायच्या.

अशी झाली सुरुवात
- या खेळाची सुरुवात 18 व्या शतकात झाली. सर्वात आधी जर्मनीचे दोन जिम्नॅस्टीकपटू जॉन फ्रेड्रीच गुट्समुट्स आणि फ्रेड्रीच लुडविग जॉन यांनी हा प्रकार जगासमोर आणला.
- जिम्नॅस्टीकचे योग्यरित्या प्रमोशन 1881 मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिम्नॅस्टीक्स (FIJ) च्या स्थापनेनंतर झाले.
- महिलांसाठीची सुरुवात 1920 मध्ये झाली. पण यापूर्वी त्याचा 1886 च्या ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यात आला होता.
- सध्या पुरुषांच्या गटात जिम्नॅस्टीकचे 6 इव्हेंट (फ्लोर एक्सरसाइज, पॉमेल हॉर्स, स्टिल रिंग्स, वॉल्ट, पॅरेलल बार्स आणि होरिझंटल बार्स) आणि 4 इव्हेंट (वॉल्ट, अनइव्हन बार्स, बॅलेंस बीम आणि फ्लोर एक्सरसाइज) यात महिला सहभागी होतात.

पुढील स्लाइड्वर पाहा, 1930-40 दरम्यानचे जिम्नॅस्टीकचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...