आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजोबांच्या विरोधामुळे आई-वडील तिला लपवून खेळायला पाठवायचे; आता राष्ट्रीय संघाची सदस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवादा (बिहार) - बिहार महिला हँडबॉल संघाची कर्णधार खुशबूच्या आजोबांना तिचे खेळणे आवडत नव्हते. मात्र, खुशबूचे आई-वडील लपवून तिला खेळायला पाठवायचे. आता त्याच खुशबूने आपल्या राज्याच्या संघाला अनेकदा चॅम्पियन बनवले. २००८ पासून ती राज्याची कर्णधार आहे. तिची निवड जिल्हा पोलिस दलमध्ये झाली आहे. तिचा येथपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण ठरला.

तीन पिढ्यानंतर अनिलसिंग यांच्या घरी दोन मुली खुशबू आणि सोनीचा जन्म झाला. मुलींनी बाहेर खेळायला जाणे, हे तिच्या आजोबांना आवडत नव्हते. ती खेळायला जायची तेव्हा तिचे आजोबा रागावत होते. शेजारीसुद्धा कुटुंंबाला टोमणे मारायचे. मात्र, तिने आई-वडिलांचा विश्वास जिंकला. मी पदकाने घर भरून टाकेल, असे तिने सांगितले. वडिलांची पिठाची गिरणी होती. आर्थिक अडचणीनंतरही त्यांनी तिला खेळायला पाठवले. तिने सुरुवातीपासून चांगला खेळ केला. यामुळे तिचे यश वर्तमानपत्रात झळकू लागले. आजोबांना हे कळले आणि तिला खेळण्यापासून राेखले. घरात बंद केले. ती सात दिवस रडत होती. बरेच महिने मैदानावर गेली नाही. फक्त रडून काहीच हाती येणार नाही, हा विचार तिने केला. आजोबांचे मन जिंकायचे तिने ठरवले. यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली. सलग अनेक स्पर्धांत विजय मिळवून दिला. २००८ मध्ये बिहार राज्याची कर्णधार बनली. बिहार गेम्समध्ये नवादाला सुवर्ण जिंकून दिले. आता व्हिएतनाम येथे आयोजित पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये ती भारतीय हँडबॉल संघाची सदस्य आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारी ती बिहारची एकमेव खेळाडू आहे. याआधी खुशबूने २०१५ मध्ये ढाका येथे झालेल्या हँडबॉल स्पर्धेतही भारताकडून सहभाग घेतला होता.

“मला माझ्या मुलीवर अभिमान आहे. आजही आपल्या समाजात मुलींना पुढे जाण्यापासून रोखले जाते. मुलीला खेळायला पाठवू नका, असे मला शेजारी म्हणायचे. मात्र, खुशबूच्या कामगिरीने त्या सर्वांची तोंडे बंद केली आहेत. अाता तेच लोक खुशबूची स्तुती करतात,’असे तिची आई प्रभादेवीने म्हटले. खुशबूची बहीण सोनी बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आहे.
बातम्या आणखी आहेत...