आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता दिव्यांग खेळाडू रॅम्पवर करणार कॅटवॉक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आपण सर्वांत आतापर्यंत सेलिब्रिटीला डिझायनर कपड्यांत पाहिले आहे. आता दिव्यांग लोकसुद्धा डिझायनर कपड्यांत झळकतील. ब्रिटिश फॅशन डिझायनर कॅथरिन टेटम आणि रॉब जोन्स यांच्या मदतीने हे शक्य होणार आहे. हे दोन्ही डिझायनर अपंग लोकांसाठी फॅशनेबल आणि आरामदायक कपडे डिझाइन करत आहेत. या कपड्यांची लाँचिंग एखाद्या मोठ्या फॅशनप्रमाणेच होईल. या फॅशन शोमध्ये ब्रिटनचे पॅरालिम्पिक खेळाडू मॉडेल बनतील. कॅथरिन आणि रॉब यासाठी ब्रिटिश पॅरालिम्पिक संघासोबत काम करणार आहेत. दोन महिन्यांनंतर हे दोन्ही डिझायनर फॅशनबेल कपड्यांना लाँच करतील. हे दोन्ही डिझायनर आपली वेगळी शैली आणि फॅॅशन सेन्ससाठी जगभर ओळखले जातात. त्यांनी नुकतेच लंडन फॅशन विकमध्ये एलबीजीटी (लेस्बियन, बायसेक्सशुअल, गे आणि ट्रान्सजेंडर) समूहासाठी खास कलेक्शन लाँच केले होते.

अपंग खेळाडू रँपवर कॅटवॉक करण्याची ही पहिली वेळ नसेल. १९९८ मध्ये अमेरिकन दिव्यांग खेळाडू एमी मुलिन्सने लंडन फॅशन वीकमध्ये डिझायनर अॅलेक्झांडर मॅक्वेनचे कलेक्शन सादर केले होते. त्याची याची खूप चर्चा झाली होती. हा नवा ट्रेंड बनेल, असे त्या वेळी लोकांना वाटले. मात्र, असे झाले नाही. आता १८ वर्षांनी पुन्हा दिव्यांग खेळाडू मॉडेलिंग करताना दिसतील.

कॅथरिन म्हणाली, “फॅशन फक्त सेलिब्रिटीसाठी नव्हे, तर सर्वांसाठी असते. सामान्य लोकांप्रमाणे दिव्यांग लोकांनीसुद्धा फॅशनसोबत जुळले पाहिजे, असे आम्हाला वाटते. आम्ही ब्रिटिश पॅरालिम्पिक खेळाडूंना आमच्यासोबत संलग्न करत आहोत. त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांची भेट घेतल्यानंतर आम्हाला कळू शकेल की, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे फॅब्रिक योग्य असेल. खेळाडूंना कम्फर्ट वाटले पाहिजे, हे आमचे प्राधान्य आहे. आमचा प्रयोग यशस्वी झाला तर आम्ही देशभर हे कलेक्शन लाँच करू. पुढच्या वर्षी होणाऱ्या लंडन फॅशन वीकमध्येसुद्धा आम्ही या थीमला पुढे नेऊ शकतो.’
बातम्या आणखी आहेत...