आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभूत न हाेण्याची यांची एक अनाेखी खुबी !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - नृत्य स्पर्धेत अव्वल तर कधी जलतरणात साेनेरी यश संपादन करून अभ्यासातही कधी मागे न राहणार्‍या १४ वर्षीय अवनी लेखराचे आयुष्य २० फेब्रुवारी २०१२ पूर्वी हसतेखेळते हाेते. मात्र, नियतीला हे सारे आनंदी जीवन पाहावले नाही. काळाने झडप घालून तिचे आयुष्यच अंधारून टाकले. कुटुंबीयांसाेबत जाताना झालेल्या अपघातामध्ये छाेट्या अवनीने पाय गमावले. मात्र, व्हीलचेअरच्या आधाराने तिने पुन्हा आपले अंधारमय आयुष्य उजळले.

लढाई जिंकली
एप्रिल २०१५ मध्ये शूटिंग रेंजमध्ये बंदूक हातात घेऊन सरावास सुरुवात केली. चार महिन्यात अवनी तरबेज झाली. यासह तिने आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्य स्पर्धेतील १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण जिंकले. ‘आयुष्याची आता नव्याने सुरुवात झाली. एके दिवशी मी देशाचे नाव उंचावेन,’ असे ती म्हणाली.