आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी वर्ल्ड लीग- भारतासमाेर सलामीला अाॅस्ट्रेलिया; वेळापत्रक जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यजमान भारतीय संघाची अापल्या घरच्या मैदानावरील हाॅकी वर्ल्ड लीग फायनलमधील वाट अधिकच खडतर मानली जात अाहे. कारण, यजमानांना अधिक कठीण ड्राॅ मिळाला अाहे. येत्या डिसेंबरमध्ये ही हाॅकी वर्ल्ड लीग भुवनेश्वर येथे हाेणार अाहे. ही स्पर्धा १ ते १० डिसेंबरदरम्यान रंगणार अाहे.  अांतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाच्या वतीने गुरुवारी वेळापत्रक अाणि  ड्राॅ काढण्यात अाला. यामध्ये भारतीय संघाला १ डिसेंबर राेजी सलामीला गत चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. यामध्ये एकूण अाठ टीमचा समावेश अाहे. या संघांची दाेन गटांत विभागणी करण्यात अाली. 
 
यजमान भारतीय संघाचा ब गटात सहभाग अाहे. याच गटात यजमानांसह गत चॅम्पियन अाॅस्ट्रेलिया,अाॅलिम्पिक कांस्यपदक विजेता जर्मनी अाणि इंग्लंडचाही समावेश अाहे. दुसरीकडे स्पर्धेच्या अ गटामध्ये अर्जेंटिना, बेल्जियम, हाॅलंड अाणि स्पेनचा समावेश करण्यात अाला. या स्पर्धेचे उपांत्य सामने ९ डिसेंबर राेजी  हाेईल. तसेच १० डिसेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार अाहे.   
 
भारताचे स्पर्धेतील सामने
१ डिसेंबर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध  
२ डिसेंबर इंग्लंडविरुद्ध  
४ डिसेंबर जर्मनीविरुद्ध
बातम्या आणखी आहेत...