आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदकाचा रंग बदलल्याचे समाधान : पी.व्ही. सिंधू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामना गमावल्यानंतर मी खूप निराश झाले होते. पण दुसऱ्याच दिवशी सर्व विसरून पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. प्रतिस्पर्धकाला कडवे आव्हान देत गेल्या वेळेच्या कांस्य पदकाचा रंग बदलून रौप्य करता आला याचे समाधान असल्याचे रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने सांगितले. 
  
जपानच्या नोझोमी ओकुहाराने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित सिंधूचा पराभव केला होता. स्पर्धेबद्दल बोलताना ती म्हणाली की, अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. यात मी आणि ओकुहारा दोघेही थकलो होतो. मी उत्तम कामगिरी केली पण दुर्दैवाने यश मिळू शकले नाही. बॅडमिंटनमधील सामन्यांचा कालावधी वाढत गेल्याने दोन्ही स्पर्धकांना एका-एका पॉइंटसाठी झगडावे लागल्याचे सिंधूने म्हटले. 
बातम्या आणखी आहेत...