आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षदाचा वर्ल्डकपमध्ये सुवर्णवेध; भारताचा दबदबा कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाबेला (अझरबैजान) - अाैरंगाबादची युवा खेळाडू हर्षदा निठवेने साेमवारी अायएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने सांघिक गटात हे यश संपादन केले. हर्षदाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देवसाल अाणि मलायका गाेएलसाेबत सुवर्णपदकाची कमाई केली. यासह भारती संघाला सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धेतील अापली पदक जिंकण्याची लय कायम ठेवता अाली. भारताने दुसऱ्या दिवशी सहा पदके जिंकली. यात एक सुवर्ण, दाेन राैप्य अाणि तीन कांस्यपदकांचा समावेश अाहे.

हर्षदा, यशस्विनी अाणि मलायकाने सांघिक गटाच्या अंतिम फेरीत ११२२ गुणांची कमाई करून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. भारताचे स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. भारताने पहिल्याच दिवशी दाेन सुवर्णपदके जिंकली. या सांघिक गटात तुर्कीचा महिला संघ राैप्य अाणि उझबेकिस्तानचा संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भारताचा अनमाेल हा पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक गटात राैप्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात अनंतजित सिंग, सुखबीर सिंग अाणि हमजा शेखने कांस्यपदक पटकावले.

गायत्री, साेनिका, अदितीला कांस्य
भारताच्या गायत्री नित्यानंदम, साेनिका अाणि अदिती सिंगने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावले. तसेच या खेळ प्रकाराच्या वैयक्तिक गटात गायत्रीने कांस्यपदकाची कमाई केली.

पुरुष गटात राैप्य
भारतीय संघाला पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात राैप्यपदकाची कमाई करता अाली. गाैरव राणा, हेमेंद्र कुशवाह अाणि साैरभ चाैधरीने सांघिक गटात दुसरे स्थान गाठले.

पदकतालिकेत भारत अव्वल
भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह दाेन राैप्य अाणि तीन कांस्यपदके जिंकली. अशा प्रकारे अाता भारताच्या नावे एकूण १३ पदकांची नाेंद झाली. भारताने पदकतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. त्यापाठाेपाठ रशियन टीम अाहे.
बातम्या आणखी आहेत...