आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्यत जिंकण्यासाठी ३७० मॅरेथाॅनमध्ये धावला, माेठी मॅरेथाॅन पूर्ण करण्याचा विक्रम करणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मॅरेथाॅन ही फारच कंटाळवाणी असते. त्यामुळे अापल्याला टीव्हीवरच पाहून याचा अानंद लुटायला हवा, असे राॅब यंग अापली मैत्रीण जाेहान हनासला म्हणाला हाेता. हे एेकताच हनास म्हणाली की, तू कधीही मॅरेथाॅनमध्ये धावू शकत नाहीस. या वेळी यंग हा दुखावला गेला अाणि त्याने अापण ५० मॅरेथाॅनमध्ये सहभागी हाेऊ इच्छिताे, असे छातीठाेकपणे सांगितले. यासाठी त्याने हनाससाेबत २० रुपयांची शर्यत लावली. हीच शर्यत पूर्ण करण्यासाठी यंग हा वर्षभरात तब्बल ३७० मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाला. तसेच मैत्रिणीसाेबत लावलेली शर्यतही जिंकली.

शर्यत लावल्याच्या दुसऱ्याच दिवशी यंग पहाटे चार वाजता उठला. रिचमंड मॅरेथाॅनमध्ये अापला सहभाग नाेंदवला अाणि त्यामध्ये ताे धावला. त्यानंतर ताे अापल्या व्यवसायामध्ये मग्न राहिला. अाता हे त्याचे दैनंदिन काम सुरू झाले. यासह त्याने एका अाठवड्यात २६२ किमीच्या १० मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेतला हाेता. यासह त्याने हे अंतर पूर्ण केले.

‘हे करत असतानाच मला मॅरेथाॅनमधील अावड निर्माण झाली. त्यामुळे मी सातत्याने अशा प्रकारे मॅरेथाॅनमध्ये सहभागी हाेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मॅरेथाॅन पूर्ण करण्याचे ध्येय मी सातत्याने गाठत गेलाे,’असेही यंग म्हणाला.यातून त्याचे एका वर्षात ३७० मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय या मॅरेथाॅनमधून त्याने १६ हजार किमीचे अंतर पूर्ण केले. शर्यत लावल्यानंतर ताे वयाच्या ३१ व्या वर्षी पहिल्यांदा मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. मैत्रिणीसाेबत शर्यत लावल्यापासून अवघ्या ४६ दिवसांत त्याने ५० मॅरेथाॅन पूर्ण केल्या. यातूनच त्याला १०० मॅरेथाॅन पूर्ण करण्यासाठी ९४ दिवस लागले. त्यानंतर त्याने अापला सहभाग कायम ठेवताना वर्षभरात ३७० मॅरेथाॅन पूर्ण केल्या. अाता अशाप्रकारे मॅरेथाॅन पूर्ण करण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचे ध्येय समाेर असल्याचे यंग म्हणाला. ‘न थांबताही त्याने सर्वात दूरचे अंतर पूर्ण करण्याचे ठरवले अाहे,’ असेही ताे म्हणाला.हा विक्रम डिन करनाजेसच्या नावे अाहे.
छायाचित्र: रिचमंड मॅरेथाॅनमध्ये धावताना यंग. इन्सेट मैत्रीण जाेहान हनास.