आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाबमुळे हिनाची इराण दौऱ्यातून माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची महिला नेमबाज हिना सिद्धूने इराण येथे होणाऱ्या एशियन एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे सक्तीचे आहे. या सक्तीमुळे हिनाने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला.

इराणची राजधानी तेहरान येथे डिसेंबरमध्ये एशियन नेमबाजी चॅम्पियनशिप होणार आहे. हिना म्हणाली, ‘प्रवास किंवा विदेशी पाहुण्यांना िहजाब घालण्यास भाग पाडणे, हे खेळभावनेच्या विरुद्ध आहे. मला हे मान्य नाही. यामुळे मी नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली.’ हा पूर्णत: खासगी विषय आहे, असे हिना म्हणाली.‘तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करा आणि मला माझ्या धर्माचे पालन करू द्या. तुम्ही तुमच्या धार्मिक अटी, नियम मला लागू करण्यास भाग पाडत असाल तर मी या स्पर्धेत सहभागी होणार नाही.’ ते डिसेंबर या काळात तेहरान येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजकांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट केले की, ‘शूटिंग रेंज आणि सार्वजनिक स्थळावर महिलांचे कपडे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या नियमानुसार असले पाहिजेत.’ हिनाच्या आधीसुद्धा या स्पर्धेतून खेळाडूंनी माघार घेतली. हिनाने यापुर्वीही इराणचा दौरा रद्द केला आहे. अनेक इस्लामिक देशांची यात्रा करणारी हिना म्हणाली, मी आधीसुद्धा इराणचा दौरा टाळला आहे. फक्त इराणच असा देश आहे, जेथे अशी सक्ती केली जाते, असेही तिने म्हटले.
बातम्या आणखी आहेत...