आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्‍सल मैदानी मातीतील कबड्डी हरवली, जाणून घ्‍या खेळाचे महत्‍त्‍व, इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबड्डी...कबड्डी...कबड्डी...म्‍हणत एंट्री करणारा दणकट खेळाडू, खेळ पाहण्‍यासाठी जमलेले ग्रामस्‍थ, मैदानातल्‍या मातीत होणारे सामने नि विजयी गटाला डोक्‍यावर घेऊन निघणा-या मिरवणूका. आज गावागावातून हरवल्‍या आहेत. भल्‍याभल्‍यांची पाठ पाहणारे कुस्‍तीपटू कबड्डीने घडवले आहेत. मात्र माध्‍यमांच्‍या वाढत्‍या प्रभावाने या खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. सध्‍या सुरू असलेल्‍या प्रो कबड्डी स्‍पर्धेला जगभरातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता हा खेळ आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पोहचण्‍यास मदत होत आहे. या अनुषंगाने कब्‍बडीचा थोडक्‍यात इतिहास व महत्‍त्व divyamarathi.com मांडत आहे.
कबड्डीची विविध नावे
महाराष्ट्र व मध्य प्रदेशात लोकप्रिय राहिलेल्‍या कबड्डी या खेळाला हुतूतू नावाने ओळखले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या खेळाचे नाव चाडू-गुडू आहे, तर केरळमध्ये वंदिकली, बंगालमध्ये दो-दो आणि पंजाबमध्ये झबर गगने या नावाने कबड्डी खेळली जाते. आज जगभरात कबड्डीचा प्रसार करण्‍यात महाराष्‍ट्राची सिंहाचा वाटा राहिलेला आहे.
राष्‍ट्रीय खेळाची ओळख
अमरावतीच्‍या जगविख्‍यात श्री हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळाने 1936 मध्ये बर्लिन ऑलिंपिकमध्ये खेळाच्या प्रसारासाठी प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. त्‍यापूर्वी म्‍हणजे 1934 मध्‍ये कबड्डीचे नियम तयार झाले आणि 1938 पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
कबड्डीचे फायदे
शरीर सुदृढ व निरोगी राहते.
निर्णय क्षमतेत वाढ होते.
धैर्य व परिस्‍थितीला सामोरे जाण्‍याची तयारी वाढते.
परस्‍पर सहकार्याची भावना वाढते. अंगी सामर्थ्‍य आणि चतुराई निर्माण होते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून, अस्‍सल मैदानी मातीतील कब्बडीचे फोटो..