आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा द. कोरियावर ५-४ ने रोमांचक विजय; पेनॉल्टी शूटआऊटमध्ये भारताचे पाच गोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वांटन- भारताने शानदार पुनरागमन करताना सुरुवातीला निर्धारित वेळेत काेरियाला २-२ ने बरोबरीत रोखले. यानंतर शूटआऊटवर ५-४ ने रोमांचक विजय मिळवत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने २०११ मध्ये विजेतेपद, तर २०१२ मध्ये उपविजेतेपद पटकावले होते.

निर्धारित वेळेत सामना २-२ ने बरोबरीत होता. यानंतर पेनॉल्टी शूटआऊटमध्ये भारताने पाचही प्रयत्नांत गोल केले, तर कोरियाला केवळ चार वेळेस गोल करता आले. भारत सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला १-२ ने मागे पडले होते. मात्र, रमणदीपने शानदार मैदानी गोल करून भारताला २-२ ने बरोबरी करून िदली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताने शूटआऊटवर सामना जिंकला.

भारताकडून सरदारा सिंग, रमणदीप सिंग, रूपिंदरपाल सिंग, आकाशदीप सिंग आणि वीरेंद्र लाकडा यांनी शूटआऊटवर कोरियाचा गोलकीपर डुप्यो हांगला चकवत गोल केले. कोरियाकडून मांजे जुंग, ह्युंगजिन किम, जुंगजुन ली आणि जोंगसुक बेई यांनी गोल केले. मात्र, देईयोल ली याच्या प्रयत्नात भारताचा गोलकीपर श्रीजेशने जबरदस्त बचाव केला. श्रीजेश पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा हीरो ठरला. श्रीजेशने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताला विजय मिळवून दिला होता.

निर्धारित वेळेत सामना २-२ ने बरोबरी सुटला
निर्धारित वेळेत भारताने पहिल्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटाला गोल केला. तलविंदर सिंगने १५ व्या मिनिटाला मैदानी गोल करून भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. सहा मिनिटांनंतर कोरियाने बरोबरीचा गोल केला. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला इन्व्यू सिआने मैदानी गोल करून स्कोअर १-१ असा केला.
बातम्या आणखी आहेत...