आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानेवारीत रंगणार हाॅकी लीग,मुंबईत उद‌््घाटन साेहळा; दबंग मुंबई-रांचीमध्ये सलामी सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये पाचव्या सत्राची हाॅकी इंडिया लीग (एचअायएल) रंगणार अाहे. येत्या २१ जानेवारीपासून या लीगला सुरुवात हाेईल. मुंबईतील मैदानावर या स्पर्धेच्या उद‌््घाटन साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले. या वेळी यजमान दबंग मंुबई अाणि रांची रेयास यांच्यात सलामीचा सामना हाेईल, अशी माहिती अांतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनचे अध्यक्ष अाणि लीगचे चेअरमन नरेंद्र बत्रा यांनी दिली. येत्या २५ फेबुवारीला स्पर्धेचे उपांत्य सामने हाेतील. त्यानंतर २६ फेब्रुवारी राेजी स्पर्धेच्या किताबासाठी दाेन संघामध्ये फायनल हाेईल. सहा फ्रंॅचायझीचे संघ या स्पर्धेत अापले नशीब अाजमावणार अाहेत.

‘युवा खेळाडूंना अापल्या प्रतिभेला चालना देण्यासाठी लीगच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळणार अाहे. अाम्हाला या सत्रामध्ये भारतातील खेळाडूंकडून अव्वल कामगिरीची अाशा अाहे. त्यांना विदेशी खेळाडूंच्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभवाचा माेठा फायदा हाेईल,’अशी प्रतिक्रिया नरेंद्र बत्रा यांनी दिली. नुकतीच त्यांची अांतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनच्या (एफअायएच) अध्यक्षपदी निवड झाली.

यजमान मुंबई संघाला अापल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी देण्याची अाशा अाहे.
बातम्या आणखी आहेत...