आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनल : भारत-पाक आज काट्याची लढत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटवर्प - आशियाई चॅम्पियन भारत आणि चॅम्पियन्स ट्राॅफीतील राैप्यपदक विजेत्या पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी काट्याची लढत रंगणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी हे दाेन्ही संघ एफआयएचच्या हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे.

भारतीय संघाने सलगच्या दाेन विजयासह स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. आता पाकिस्तानविरुद्ध सामन्यात बाजी मारून स्पर्धेत विजयाची हॅट् ट्रिक नाेंदवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे हा सामना अधिकच रंगतदार हाेण्याची शक्यता आहे. दाेन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी सामन्यातील विजयावर अधिक भर देतील. त्यामुळे हा सामना चाहत्यांसाठी माेठी पर्वणीच ठरणारा आहे. गत सामन्यातील पराभवामुळे सध्या पाकचा संघ अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारतविरुद्ध सामन्यात पाक टीमला माेठी कसरत करावी लागेल.

वाल्मीकी बंधू फाॅर्मात
सलगच्या दाेन विजयाने भारतीय पुरुष हाॅकी टीमचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे. तसेच टीममधील युवराज आणि देवींदर हे वाल्मीकी बंधू सध्या जबरदस्त फाॅर्मात आहेत. या दाेघांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने गत सामन्यात पाेलंडचा पराभव केला हाेता. आता हीच लय कायम ठेवून टीमच्या विजयामध्ये माेलाचे याेगदान देण्याचा या दाेघांचाही प्रयत्न असेल. तसेच सरदारासिंगकडूनही माेठ्या खेळीची आशा आहे.

पाकिस्तान टीमसमाेर माेठे आव्हान
नुकत्याच झालेल्या इंचियाेन आशियाई चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने पाकचा धुव्वा उडवला हाेता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भुवनेश्वर येथील सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारली. आता वर्ल्ड हाॅकी लीगच्या सामन्यातही भारतीय संघ आपली लय कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पाकसाठी आव्हानात्मक असेल.
बातम्या आणखी आहेत...