आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू, के. श्रीकांतसमाेर अाव्हान; सायनाची माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेवलून- जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने गंभीर दुखापतीमुळे हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली अाहे. तिच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू पी. व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहेत. हाँगकाँग अाेपनला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे.
नुकतेच सायना नेहवालने चीन अाेपन सुपर सिरीजमध्ये उपविजेतेपद पटकावले. मात्र, यादरम्यान तिला दुखापत झाली. त्यामुळे तिला हाँगकाँग येथील ३५०,००० डाॅलरचे बक्षीस असलेल्या स्पर्धेत सहभागी हाेता अाले नाही. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील दाेन वेळची कांस्यपदक विजेत्या सिंधूवर महिला एकेरीत भारताची मदार असेल. तसेच अजय जयराम अाणि एचएस प्रणय हे दाेघेही पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहेत. डच अाेपन चॅम्पियन जयरामचा सामना चेन लाेंगशी हाेईल. तसेच इंडाेनेशिया मास्टर्स विजेता प्रणयसमाेर लीन डॅनचे तगडे अाव्हान असेल. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पाेनप्पा खेळणार अाहेत.

सिंधूसमाेर सलामीला मरिन
महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंधूची स्पर्धेतील वाट अधिकच खडतर अाहे. तिला एकेरीच्या अापल्या सलामी सामन्यात जगातील नंबर वन अाणि वर्ल्ड चॅम्पियन कॅराेलिना मरिनच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. त्यामुळे हा सामना तिच्यासाठी अाव्हानात्मक असेल. मात्र, सिंधूने डेन्मार्क अाेपनमध्ये अाॅल इंग्लंड चॅम्पियन मरिनला धूळ चारली हाेती.

श्रीकांतची परीक्षा : गतवर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या के. श्रीकांतची यंदा मात्र परीक्षा असेल. त्याला पुरुष एकेरीच्या सलामीला चीनच्या टियान हाेवेईविरुद्ध खेळावे लागेल. अातापर्यंत चार सामन्यांत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या हाेवेईने श्रीकांतला धूळ चारली अाहे. त्यामुळे चीनच्या या खेळाडूला राेखण्याचे माेठे अाव्हान भारताच्या खेळाडूसमाेर असेल. त्याला यासाठी माेठी मेहनत घ्यावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...