आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू 39 मिनिटांत विजयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलून- रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने अवघ्या ३९ मिनिटांमध्ये गुरुवारी  हांॅगकांॅग अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अाता तिला अंतिम अाठमध्ये अकाने यामागुचीचे अाव्हान असेल. पाचव्या मानांकित यामागुचीने फ्रेंच अाेपनच्या उपांत्य फेरीत सिंधूवर मात केली हाेती.   


दुसरीकडे सिंगापूर अाेपन एच.एस. प्रणयला पुुरुष एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ताे स्पर्धेतून बाहेर पडला.  जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये बिगरमानांकित अाया अाेहाेरीवर मात केली. तिने २१-१४, २१-१७ अशा फरकाने सामना जिंकला. 


साकाईची प्रणयवर मात

बिगरमानांकित काझुमासा साकाईने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये एच.एस. प्रणयवर मात केली. त्याने ११-२१, २१-१०, २१-१५ ने सामना जिंकला. यासाठी त्याला ५४ मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. 

 

सायनाचा पराभव
माजी नंबर वन सायना नेहवालचा गुरुवारी महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. चीनच्या युफेनने ६१ मिनिटांत सायनावर मात केली. तिने १८-२१, २१-१०, २१-१५ ने सामना जिंकला. या पराभवामुळे सायनाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.  ती सलग दुसऱ्या स्पर्धेत अपयशी ठरली.

बातम्या आणखी आहेत...