आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलनीतील मुलीवर लट्टू होता पार्थिव, असे केले होते प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालेला विकेटकिपर आणि बॅट्समन पार्थिव पटेलची लव्हस्टोरी इन्ट्रेस्टिंग आहे. पार्थिवने त्याची बालपणीची मैत्रिण अवनी झव्हेरीसोबत २००८ मध्ये लग्न केले होते. पार्थिवचे लग्न हे त्याच्या बर्थ डेच्या दिवशीच झाले. पार्थिव आणि अवनी एकाच कॉलनीमध्ये राहात होते, येथेच त्यांची रोज गाठभेट होत होती.
लव्हस्टोरीची सुरुवात एका लाँग ड्राइव्हने...
पार्थिव आणि अवनीची मैत्री आता प्रेमात रुपांतरीत झाली होती. पण दोघेही एकमेकांना सांगायला घाबरत होते. पार्थिवला वाटत होते की आपल्या मनात काय आहे ते एकदाचे अवनीला सांगून टाकावे. परंतू अवनीच्या मनात काय आहे, हा विचार करुनच तो घाबरुन जात होता.
अवनीला इम्प्रेस करण्यासाठी तो तिला लाँग ड्राइव्हवर घेऊन गेला. रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून त्याने पुष्पगुच्छ देत अवनीला प्रपोज केले होते. पार्थिवचा हा अंदाज अवनीला भावला. कायम घाबरत-घाबरत बोलणारा पार्थिव अशा अंदाजात प्रपोज करेल याचा तिने विचारही केला नव्हता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अशी दिसते पार्थिवची सुंदर पत्नी...
बातम्या आणखी आहेत...