आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील बास्केटबॉलपटूंसमोर 'सतराशे विघ्ने'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
अाैरंगाबाद - महाराष्ट्रामध्ये सध्या बास्केटबाॅल महासंघातील अंतर्गत वाद, अत्याधुनिक इनडाेअर काेर्ट अाणि प्रशिक्षकांच्या अभावामुळे खेळाडूंना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत अाहे. त्यामुळेच राज्यात ‘सतनाम’सारख्या युवा खेळाडूंच्या करिअरसाठी सुरू असलेल्या धडपडीला पुर्णविराम मिळत असल्याचे चित्र अाहे. यासाठी अाता अंतर्गत वाद मिटवून खेळाच्या प्रसार व विकासाला चालना मिळावी, अशी अाशा राज्यातील युवा खेळाडूंकडून व्यक्त केली जात अाहे.
वुडन काेर्टची बिकट परिस्थिती: बास्केटबाॅलच्या प्रसार व प्रचाराला चालना मिळावी म्हणून शासनाने इनडाेअर वुडनची अत्याधुनिक पद्धतीची मैदाने उपलब्ध केली. ही मैदाने राज्यातील साेलापूर, नागपूर, पुणे व मुंबई या माेजक्या ठिकाणी अाहेत. मात्र, याचा खेळाडूंना उपयाेग हाेत नाही.

महासंघातील वाद विकाेपाला
वर्चस्वासाठी असलेला बास्केटबाॅलच्या महासंघातील वाद चांगलाच विकाेपाला गेला. त्यामुळे केंद्र शासनाने वेळीच हस्तक्षेप करून वाद निवळेपर्यंत या खेळाला मिळणारे अनुदान बंद केले. त्यामुळे खेळ अाणि खेळाडूंच्या विकासाची गती पूर्णपणे मंदावली.

इनडाेअर वुडन काेर्टचा अभाव
राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय स्पर्धा या इनडाेअर वुडन काेर्टवर हाेतात. राज्यात अावश्यक असणा-या मैदानांचा अभाव अाहे. त्यामुळे राज्यातील खेळाडूंना सराव नाही. यातून महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत समाधानकारक अशी कामगिरी करू शकत नाहीत. सिमेंटच्या कडक मैदानावर त्याचा सराव हे खेळाडू करत असल्याचे वास्तव अाहे.

अशा अाहेत अडचणी
१.शासनाच्या पात्र एनअायएस काेचचा अभाव
२.मैदानांचा अभाव
३.राज्य, जिल्हा, शासनाची प्रशिक्षण अकादमी नाही
४.मर्जीतील लाेकांना प्राधान्य देण्याचा गैरप्रकार
५.महिला खेळाडूंची असुरक्षितता
६.पंच, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये शिस्तीचा अभाव

वादामुळे बळी
बास्केटबाॅल संघटनेमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा माेठा फटका खेळाडूंना बसत अाहे. याच वादामुळे राज्यात बास्केटबाॅलच्या विकासालाही खीळ बसली. राज्यात अनेक प्रतिभावंत खेळाडू अाहेत. मात्र, त्यांच्या प्रतिभेला चालना देणारी यंत्रणाच पूर्णपणे थंड बस्त्यात अाहे.
शत्रुघ्न गाेखले, उपाध्यक्ष