आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बात्रा यांच्‍याशी वाद झाल्‍याने माझी हकालपट्टी', हॉकी टीमचे कोच पॉल यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हॉकी इंडियाने पॉल व्हॅन अॅस यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केली आहे. वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्यावेळी मलेशिया विरुध्दच्या सामन्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांच्याशी जाहीर वाद झाल्‍याने आपल्‍याला काढून टाकण्‍यात आले आहे, असा दावा पॉल यांनी केला आहे.
सध्‍या परफॉर्मेंसचे डायरेक्‍टर रोइलँट ओल्टमन्स यांच्‍याकडे पॉल यांची जबाबदारी सोपवली आहे. 'डॉ. बात्रा यांना कोण्‍याही परिस्‍थितीत मी भारतीय टीमच्‍या प्रशिक्षकपदी नको होतो.' असेही पॉल यांनी म्‍हटले आहे. पॉल यांनी बेल्जियममध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगमधील भारतीय ह़ॉकी संघाच्या कामगिरीचा अहवाल दिला नाही. तेव्हाच ते प्रशिक्षकपदी राहतील की, नाही याची चर्चा सुरु झाली होती.
अधिकृत सूचना नाही
हिमाचलप्रदेशच्या शिलारु येथील साईच्या केंद्रात राष्ट्रीय हॉकी संघाचे शिबिर सुरु झाले. या शिबिराला व्हॅन अॅस अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाली होती. पण या संदर्भात आपल्‍याला व्‍यवस्‍थापनाकडून अधिकृत माहिती देण्‍यात आली नाही, असेही पॉल म्‍हणाले.