आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी प्रोफेशनल बॉक्सर नाही बनणार - मेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - मला देशासाठीच खेळणे आवडते. मला प्रोफेशनल बॉक्सर बनण्यात कसलाच रस नाही, असे मत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मेरी कोमने सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंद्रसिंगने रिअो आॅलिम्पिकमधून माघार घेत प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले. मात्र, मेरी कोमचा असा विचार नाही. रिअो ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेऊन आपल्या अकादमीवर लक्ष केंद्रित करण्याचे मेरी कोमने ठरवले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.