आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीच्या महिला संघात स्मृतीची निवड, आयसीसी संघात स्मृती मंधाना एकमेव भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी वर्षाच्या आयसीसी महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. यात स्मृती मंधानाच्या रूपाने एकमेव भारतीय खेळाडूने आयसीसी संघात स्थान मिळवले आहे.

आयसीसीने आपल्या १२ सदस्यीय वर्षाच्या सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेट संघाची कर्णधार वेस्ट इंडीजला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या स्टेफनी टेलरला केले आहे. न्यूझीलंडच्या रिचेल प्रिस्टकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी दिली आहे. आयसीसीने १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या काळातील खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आधारावर संघनिवड केली आहे.

२० वर्षीय स्मृती मंधानाने आतापर्यंत २३ वनडेत ३०.४७ च्या सरासरीने ७०१ धावा काढल्या आहेत. यात तिने एक शतक आणि ५ अर्धशतके काढली आहेत. वनडेत १०२ धावा हा तिचा सर्वोच्च स्कोअर आहे. याशिवाय तिने २७ टी-२० सामन्यांत १७.६६ च्या सरासरीने ४२४ धावा काढल्या आहेत. टी-२० मध्ये ५२ धावा हा तिचा सर्वोच्च स्कोअर आहे.

आयसीसीच्या महिला संघात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या प्रत्येकी २ खेळाडू आहेत, तर भारताकडून स्मृती एकमेव आहे. द. आफ्रिकेच्या सुने लुसला यात स्थान मिळाले. तर महिला संघात १२ वी खेळाडू म्हणून आयर्लंडच्या किम गर्थची निवड झाली.

आयसीसीचा वर्षाचा महिला संघ असा : (फलंदाजी क्रमानुसार) सुजी बेट्स (न्यूझीलंड), रिचेल प्रिस्ट (न्यूझीलंड), स्मृती मंधाना (भारत), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज, कर्णधार), मगे लेनिंग (ऑस्ट्रेलिया), एलिसे प्रेरी (ऑस्ट्रेलिया), हिटर नाइट (इंग्लंड), डिंड्रा डोट्टिन (वेस्ट इंडीज), सुने लुस (द. आफ्रिका), अन्य श्रुबसोल (इंग्लंड), लीग कास्प्रेक (न्यूझीलंड), किम गर्थ (आयर्लंड).

बातम्या आणखी आहेत...