आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरीन सिलीच-राॅजर फेडरर अाता किताबासाठी झुंजणार, फेडरर 138 मिनिटांत फायनलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरीन सिलीच - Divya Marathi
मरीन सिलीच
लंडन - सातव्या मानांकित मरीन सिलीच अाणि १८ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राॅजर फेडरर अाता रविवारी  विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या किताबासाठी झुंजणार अाहेत. या दाेघांनी शानदार विजयाच्या बळावर अंतिम फेरी गाठली. क्राेएशियाच्या मरीनने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने लढतीत अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा पराभव केला. त्याने २ तास ५६ मिनिटांच्या मॅरेथाॅन लढतीमध्ये ६-७, ६-४, ७-६, ७-४  अशा फरकाने विजय मिळवला.  
 
बाेपन्नाची मॅरेथाॅन झुंज व्यर्थ 
भारताच्या राेहन बाेपन्नाने कॅनडाच्या गॅब्रियला डाब्राेवस्कीसाेबत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दिलेली मॅरेथाॅन झुंज अपयशी ठरली. या जाेडीला फिनलंडच्या हेन्री अाणि इंग्लंडच्या हिथर वाॅटसनने पराभूत केले. हेन्री-वाॅटसनने ६-७, ६-४, ७-५ ने सामना जिंकला.
 
फेडरर १३८ मिनिटांत फायनलमध्ये
स्विसकिंग राॅजर फेडररने अवघ्या १३८ मिनिटांत पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. त्याने शुक्रवारी उपांत्य सामन्यात चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचला धूळ चारली. त्याने ७-६, ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम फेरी गाठली. अाता त्याची नजर १९ वा ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याकडे लागली अाहे. त्यासाठी ताे रविवारी फायनल खेळणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...