आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Inderjeet Singh, Jinson Johnson Win Gold For India In Asian Athletics Grand Prix

आशियाई अ‍ॅथलेटिक्स ग्रँडप्रिक्स : इंद्रजित, जिन्सन जॉन्सनला सुवर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - गोळाफेकपटू इंद्रजित सिंग आणि धावपटू िजन्सन जॉन्सन यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स ग्रँडप्रिक्समध्ये सोमवारी भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. बँकॉकच्या नॅशनल स्टेडियममध्ये इंद्रजितने पुरुष गटात १९.८३ मीटर इतक्या अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदक आपल्या नावे केले.

इंद्रजितचे हे एकाच महिन्यात दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने ३ जून रोजी चीनच्या वुहान येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कमाई केली होेती. भारताचा धावपटू जॉन्सन हा सोमवारी सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याने १.४८.५२ सेकंदांच्या वेळेस पुरुषांच्या ८०० मीटर फायनल शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
बातम्या आणखी आहेत...