आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दिला 3-2 ने दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- मलेशियात सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला रोमांचक सामन्यात ३-२ ने हरवले. स्पर्धेतील तीन सामन्यांत भारताचा हा दुसरा विजय आहे. या िवजयासह भारतीय हॉकी संघ गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. भारताने पहिल्या सामन्यात जपानला एकतर्फी सामन्यात १०-२ ने हरवले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात द. कोरियासोबत भारताचा सामना १-१ ने ड्रॉ झाला.

पहिल्या हाफमध्ये स्कोअर ०-० असा होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुनरागमन करताना प्रदीप मोरच्या शानदार गोलच्या बळावर १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडे १-० अशी आघाडी होती. पाकिस्तानला तिसऱ्या क्वार्टरमध्ये यश मिळाले. ३१ व्या मिनिटाला मोहंमद रिजवानने गोल करून स्कोअर १-१ असा बरोबरीत केला. ३९ व्या मिनिटाला मोहंमद इरफान ज्युनियरने एक फील्ड गोल करून पाकला सामन्यात २-१ ने पुढे केले. मात्र, काही वेळेतच रूपिंदर पालने दबाव दूर केला. त्याने ४३ व्या मिनिटात पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून स्कोअर २-२ असा बरोबरीत केला. तिसरे क्वार्टर संपण्याच्या आधी ४४ व्या मिनिटाला रमणदीपसिंगने एक फील्ड गोल करून हा स्कोअर ३-२ असा केला.
बातम्या आणखी आहेत...