आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय करू शकतात बास्केटबाॅलमध्ये प्रगती, एनबीए सुपरस्टार केविन डुरंटला विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू अाॅर्लियन्स - बास्केटबाॅल हा खेळ साधारणपणे उंच असलेल्या खेळाडूंचा मानला जाताे. ६ फूट अाणि ६ इंचांची उंचीही या खेळामध्ये सामान्य मानली जाते. मात्र, यावर जगातील सर्वात माेठ्या बास्केटबाॅल लीग एनबीएचा सुपरस्टार केविन डुरंटचा विश्वास नाही. 
 
त्याच्या मते, या खेळामध्ये उंचीला काेणतेही महत्त्व नाही. खेळाप्रतीची अावड अाणि पॅशन अधिक गरजेची अाहे. त्यामुळे भारतीयदेखील अमेरिका अाणि कॅनडाच्या खेळाडूंप्रमाणे या खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतात, असा विश्वास त्याने व्यक्त केला. त्यासाठी  इच्छाशक्ती अाणि मेहनतीची गरज असल्याचेही त्याने सांगितले. 
 
कमी उंचीच्या थाॅमसची चमकदार कामगिरी  
बास्केटबाॅलमध्ये उंचीला अधिक महत्त्व असते तर बाेस्टन सेलिक्सच्या इसाया थाॅमस हा यशस्वी हाेऊ शकला नसता. थाॅमसची उंची ही ५ फूट ९ इंच अाहे. मात्र तरीही त्याने  उल्लेखनीय कामगिरी करून यंदाच्या सत्रामध्ये अापला दबदबा निर्माण केला. त्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावरून उंचीपेक्षा इच्छाशक्तीचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून येते.   
 
जुलैत डुरंट भारत दाैऱ्यावर
केविन डुरंट हा अागामी जून-जुलैमध्ये भारताचा दाैरा करणार अाहे. या दाैऱ्यामध्ये ताे भारतातील अनेक प्रतिभावंत युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार अाहे. यासाठी ताे लवकरच दिल्लीमध्ये एनबीएची अकादमी सुरू करणार अाहे. या वृत्ताला त्याने दुजाेरा दिला.  
 
वेस्टर्न काॅन्फ्रन्सकडून खेळणार  : ६६६ व्या एनबीए अाॅल स्टार सामन्यामध्ये डुरंट हा वेस्टर्न काॅन्फ्रन्सकडून खेळणार अाहे. हा सामना २० फेब्रुवारी राेजी भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण २०० देशांत ४० भाषांमध्ये हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...