आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Continues To Impress, Wins Five More Medals At Commonwealth Youth Games

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा राष्ट्रकुल स्पर्धा : दीपक, हादिशने पटकावले सुवर्ण !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅपिया (सामोआ) - पाचव्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलिट्सची दमदार कामगिरी दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. त्यामुळे संघाच्या खात्यात दोन सुवर्णपदकांसह पाच आणखी पदकांची भर पडली आहे.

भारोत्तोलक दीपक लाथरने पुरुषांच्या ६२ कलो वजन गटात तर मोहंमद हादिशने भालाफेकीत सोनेरी पदक जिंकले. महिलांच्या ४०० मी. शर्यतीत धावक जिस्ना मॅथ्यू, पुरुषांच्या ४०० मी. शर्यतीत चंदन बाऊरी यांनी रौप्यपदक पटकावले. मुलांच्या एकेरी स्क्वॅशमध्ये वेल्वन सेंथीलकुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्डमध्ये बिअंत सिंगने पुरुषांच्या ८०० मी. शर्यतीची अंतिम फेरी गाठली असून तिसर्‍या दिवशी तो पदकांच्या शर्यतीत असेल. त्याने १ मि.५२.९३ सेकंद वेळ काढून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. स्क्वॅशमध्ये सेंथीलकुमारने पाकिस्तानच्या इसरार अहमदला कांस्यसाठी झालेल्या सामन्यात ३-० ने (११-०, ११-०, ११-०) ने नमवले.

ट्रॅक अँड फील्डमध्ये दोन पदके
भारतीय अ‍ॅथलिट्सने ट्रॅक अँड फील्डमध्ये तीन प्रकारांतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तिघांनीही वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसह पदके पटकावली. भालाफेकपटू मोहंमद हादिशने ७९.२९ मी. फेक करून सुवर्णपदक पटकावले. सुताच्या फरकाने त्याचा स्पर्धा विक्रम हुकला. दुसर्‍या स्थानावरील इंग्लंडच्या जाॅर्ज डेव्हिसने केवळ ६८.२३ मी. अंतर काबीज केले. ितकडे जिस्ना मॅथ्यूने ४०० मी. शर्यतीत ५३.१४ सेकंद वेळ नोंदवून तर बाऊरीने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट ४५.९९ सेकंद वेळ काढून रौप्यपदकावर ताबा मि‍ळवला.

१५ वर्षीय भारोत्तोलकाचा वि‍क्रम
भारताचा १५ वर्षीय भारोत्तोलक लाथेरने भारताला पुरुषांच्या ६२ किलो वजन गटात यश मळवून दिले. त्याने स्नॅचमध्ये १२० कि‍लो तर क्लीन अँड जर्कमध्ये १३८ किलो वजन उचलले. त्याने स्नॅचमध्ये उचललेले वजन हा युवा राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम आहे.

पदकतालिकेत भारत पाचवा
दुसर्‍या दि‍वशी भारतीय खेळाडूंनी मि‍ळवलेल्या पाच पदकांमुळे चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके अशा एकूण आठ पदकांसह भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसर्‍या स्थानी द.आफ्रिका, ति‍सर्‍या क्रमांकावर इंग्लंड आणि चौथे स्थान न्यूझीलंडने बळकावले आहे.