आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदिरमन कप बॅडमिंटन: भारताची इंडोनेशियावर 4-1 ने मात; बादफेरीच्या आशा कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - भारताने सुदिरमन कप मिश्र टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये माजी चॅम्पियन इंडोनेशियाला ४-१ ने हरवले. या विजयाने भारताच्या बादफेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. सोमवारी भारताचा डेन्मार्ककडून १-४ ने पराभव झाला होता.
 
बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला पाचवे मानांकित इंडोनेशियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. भारताने पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत विजय मिळवला. फक्त पुरुष दुहेरीत हरलो.
 
अश्विनी पोनप्पा-सात्त्विक साईराज रनकिरेड्डी यांनी तोनतोवी अहमद-ग्लोरिया एमानुअल विडजाजा यांना २२-२०, २१-१७, २१-१९ ने हरवले. हा सामना एक तास मिनिटे रंगला. सिंगापूर ओपनचा फायनलिस्ट एस. श्रीकांतने जोनाटन क्रिस्टीला २१-१५, २१-१६ ने हरवले. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने ब्रेकपर्यंत ११-६ ची आघाडी घेतली होती. ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम ठेवली. दुसरा गेमसुद्धा श्रीकांतने एकतर्फी शैलीत जिंकला. श्रीकांतचा हा इंडोनिशयाच्या टॉप-३ सामील खेळाडूंवर तिसरा विजय ठरला आहे. या सामन्यासह भारताची इंडोनेशियावर २-० ने आघाडी झाली.
 
भारत आणि डेन्मार्क दोघांनी ग्रुपमध्ये प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता बादफेरीचा निर्णय बुधवारी होणाऱ्या इंडोनेशिया-डेन्मार्क सामन्यावरून होईल. इंडोनेशियाने डेन्मार्कला हरवले तर बादफेरीचा निर्णय सामन्यांची संख्या, गेम आणि गुणांवरून होईल. डेन्मार्कने जर इंडोनेशियाला हरवले तर डेन्मार्क आणि भारत बादफेरीत पोहोचतील. भारताला आतापर्यंत फक्त २०११ मध्येच बादफेरी गाठता आली. मागच्या दोन सत्रांत तर भारताला साखळीच्या पुढेही जाता आले नाही.
 
फक्त २०११ मध्ये भारताचा बादफेरीत प्रवेश
पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना वर्ल्ड नंबर वन मार्कस फेरनाल्डी आणि केविन संजाया यांनी २१-९, २१-१७ ने हरवले. सामना २-१ असा झाला. यानंतर महिला एकेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने ४२ मिनिटांत विजय मिळवला. सिंधूने फितरेनी फितरेनीला २१-९, २१-१९ ने हरवले. या सामन्यानंतर भारताची आघाडी ३-१ अशी झाली. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात सै. मोदी ग्रां.प्री. गोल्ड रनरअप जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी डेला डेस्टियारा रोशयिता एकाला २१-१२, २१-१९ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...