आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी : एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताची जपानवर मात, रूपिंदरचे सहा गोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुआंटन (मलेशिया) - डिफेंडर रूपिंदर पाल सिंगच्या शानदार सहा गोलच्या बळावर भारताने एशियन हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत गुरुवारी जपानला १०- २ गोलने मात दिली. भारताचा पुढील सामना २२ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.

रूपिंदरने पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या हाफमध्ये प्रत्येकी दोन-दोन गोल केले. त्याचप्रमाणे रमणदीप सिंगने दुसऱ्या हाफमध्ये दोन फॉरवर्ड तलविंदर सिंगने दुसऱ्या हाफमध्ये एक आणि फॉरवर्ड अफन युसूफने चौथ्या हाफमध्ये एका गोल केला. जपानकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या हाफमध्ये प्रत्येकी एक-एक गोल झाला.

भारतीय संघाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. रमणदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर रूपिंदरने नवव्या आणि बाराव्या मिनिटाला शानदार गोल केले. लगेच तीन मिनिटानंतर रमणदीपने १५ व्या मिनिटाला गोल करून ४-० ने संघाला आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या हाफचा खेळ सुरू झाल्यानंतर दोन मिनिटात १७ व्या मिनिटाला रूपिंदरने गोल करत ५-० गोलवर संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. त्यानंतर दाेनच मिनिटांनी तलविंदरने १९ व्या मिनिटाला एक गोल नोंदवला. लयात असलेल्या रूपिंदरने आपले आक्रमण सुरूच ठेवत २२ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर एक गोल करत दुसऱ्या हाफमध्ये ७-० अशी गोलची स्थिती राहिली. जपानच्या तनाका केंटा याने २३ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये २८ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले.

मलेशियाने मारली बाजी
दुसरीकडे यजमान मलेशियाने गत विजेत्या पाकिस्तानला ४-२ ने पराभूत करत जबरदस्त सुरुवात केली. मलेशियाच्या फैजल सारीने २ गोल व फिरहान अन्सारी व सहरील सबाहने प्रत्येकी एक गोल केला.
बातम्या आणखी आहेत...