आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, इंग्लंड, बेल्जियम फायनलच्या शर्यतीत; जर्मनी, द. कोरिया बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- वर्ल्ड चॅम्पियन आणि जगातील नंबर वन टीम ऑस्ट्रेलियाने एफआयएच चॅम्पियन ट्रॉॅफी हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमधील दुसरी टीम म्हणून तीन संघ शर्यतीत आहेत. हे तीन संघ भारत, बेल्जियम आणि इंग्लंड आहेत. भारतीय संघ गुरुवारी आपला अखेरचा साखळी सामना अॉस्ट्रेलियासोबत खेळेल.

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी बेल्जियमला २-० ने पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारताला आशियाई टीम द. कोरियाला २-१ ने पराभूत करीत आपले आव्हान कायम ठेवले होते. दुसरीकडे इंग्लंडने गतचॅम्पियन जर्मनीसोबत १-१ ने ड्रॉ करीत जगातली तिसऱ्या क्रमांकाची टीम जर्मनीला किताबाच्या शर्यतीत बाहेर केले.

भारत एकदाही विजेता नाही : चॅम्पियनट्रॉफीचा इतिहास बघितला तर १९७८ पासून आतापर्यंत भारतीय संघ एकदाही या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचू शकलेला नाही. भारताचे स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन १९८२ मध्ये जिंकलेले कांस्यपदक आहे. भारतीय संघ सात वेळा चौथ्या स्थानी राहिला. २०१४ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळवले. त्यावेळी संघांनी सहभाग घेतला होता.

ऑस्ट्रेलिया टॉपवर : ऑस्ट्रेलियासध्या १० गुणांसह गुणतालिकेत टॉपवर आहे. भारत गुणांसह दुसऱ्या, इंग्लंड गुणांसह तिसऱ्या, बेल्जियम गुणांसह चौथ्या स्थानी आहे. कोरिया आणि जर्मनी प्रत्येकी गुणांसह पाचव्या, सहाव्या स्थानी आहेत.

या वेळी भारताला संधी
भारताने मागच्या स्पर्धेत आॅस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत करून चौथे स्थान मिळवले होते. भारताकडे या वेळी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. भारताने फायनलमध्ये प्रवेश केला तर रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या पदकाची आशा वाढेल.