आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Got 5 Medals On First Day Of Asian Shooting Championship

अाशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप : जितूने जिंकले राैप्य; भारताला सात पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेत - भारतीय संघाने १३ व्या अाशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमधील पदक जिंकण्याची अापली माेहीम दुसऱ्या दिवशीही अबाधित ठेवली. भारतीय संघाने बुधवारी सात पदकांची कमाई केली. यासह अाता भारताच्या नावे दाेन दिवसांत १२ पदकांची नाेंद झाली.
दुसऱ्या दिवशी भारताचा अव्वल नेमबाज जितू राॅयने राैप्यपदकावर नाव काेरले. त्याने ५० मीटर पिस्तूल प्रकारात हे यश संपादन केले. त्याने १८९.५ गुणांसह दुसरे स्थान गाठले.
या गटात दक्षिण काेरियाच्या पार्क देईहूनने विक्रमांसह सुवर्णपदक अापल्या नावे केले. त्याने १९९.२ गुणांसह हे साेनेरी यश मिळवले. या गटात भारताचा प्रकाश नजप्पा ५५३ गुणांसह ११ व्या व अाेमकार सिंग ५४५ गुणांसह २४ व्या स्थानावर राहिला.
तसेच ज्युनियर महिलांच्या ५० मीटर रायफल प्राेन प्रकारात युवा नेमबाज गायत्रीने ६१४.६ गुणांसह राैप्यपदक पटकावले. या प्रकाराच्या सांघिक गटात भारताचा संघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला. गायत्री, श्रीनिधी व साेनिकाने १८३० गुणांसह दुसरे स्थान गाठले.
अखिल चमकला
भारताचा युवा नेमबाज अखिल श्याेरणने १० मीटर एअर रायफल प्रकारात राैप्यपदक पटकावले. याच गटात भारताचा प्रशांत कांस्यपदकाचा मानकरी ठरला.या प्रकाराच्या सांघिक गटात अखिल, प्रशांत अाणि प्रतीक बाेसने भारताला राैप्यपदक मिळवून दिले.