आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनडा अाेपन बॅडमिंटन स्पर्धा : साईप्रणीत, मनू अत्री-सुमीतने जिंकला किताब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलेगरी - भारताचा युवा खेळाडू बी. साईप्रणीत अाणि मनू अत्री-सुमीत रेड्डी कॅनडा अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या खेळाडूंनी स्पर्धेत किताबाची कमाई केली. साईप्रणीत हा पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. तसेच मनू अत्री अाणि सुमीत रेड्डीने पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. या युवा खेळाडूंनी एकाच दिवशी भारतीय संघासाठी किताबाचा डबल धमाका उडवला. यासह त्यांनी ५५ हजार डाॅलरचे बक्षीस असलेली स्पर्धा जिंकली. प्रणीतचे यंदाच्या सत्रातील हे पहिले विजेतेपद ठरले.
भारताच्या २३ वर्षीय साईप्रणीतने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये काेरियाच्या ली ह्यूनला धूळ चारली. त्याने २१-१२, २१-१० अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने विजेतेपद अापल्या नावे केले. त्याने अवघ्या ३० मिनिटांत शर्थीची झंुज देत विजयश्री खेचून अाणली. दमदार खेळीच्या बळावर त्याने सामना जिंकला. पराभवामुळे काेरियाच्या खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मनू-सुमीतचा विजय
रिअाे अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवणाऱ्या मनू अत्री अाणि सुमीत रेड्डीने पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सहज विजय संपादन केला. या अव्वल मानांकित जाेडीने सामन्यात यजमान काेरियाच्या अांद्रियन लियू अाणि टाेबीचा घरच्या मैदानावर पराभव केला. त्यांनी २१-८, २१-१४ ने सरळ दाेन गेममध्ये विजय संपादन केला. यासह अव्वल मानांकित जाेडी किताबाची मानकरी ठरली.
साईप्रणीतने काढला वचपा
काेरियाच्या ली ह्यूनने उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित अाणि भारताच्या अजय जयरामला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला हाेता. मात्र, त्याला अंतिम सामन्यात भारताच्या साईप्रणीतने धूळ चारून जयरामच्या पराभवाचा वचपा काढला.
भारतीय खेळाडूंवर नजर अाजपासून यूएस अाेपन
एल माेंटे | भारताचे युवा खेळाडू साईप्रणीत, मनू अत्री-सुमीत रेड्डीसह प्रणय, अानंद पवारची नजर अाता किताबाकडे लागली अाहे. मंगळवारपासून अमेरिकन अाेपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. साईप्रणीत व मनू-सुमीतने कॅनडा अाेपनचे विजेतेपद पटकावले अाहे. भारतीय खेळाडू अव्वल कामगिरीसाठी सज्ज झाले.
सहभागी भारतीय खेळाडू
बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणय, अजय जयराम, प्रतुल जाेशी, गुरुसाईदत्त, अानंद पवार, मनू अत्री, सुमीत रेड्डी, अक्षय देवालकर, जे. मेघना, पूर्वीशा, ज्वाला गुट्टा, अश्विनी पाेनप्पा, एन. सिक्की, ऋत्विका गाडे, तन्वी लाड.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...