आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिंपिकसाठी हॉकी संघाची घोषणा, कर्णधारपदावरून सरदार सिंहला हटविले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी आहे पुरुष हॉकी टीम - Divya Marathi
अशी आहे पुरुष हॉकी टीम
नवी दिल्ली- स्टार हॉकी खेळाडू सरदार सिंह याला रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी कर्णधारपदावरून हटविले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाची आज मंगळवारी दुपारी घोषणा करण्यात आली. संघाचा कर्णधार म्हणून पीआर श्रीजेश याला संधी दिली गेली आहे. श्रीजेश यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कर्णधार होता. जेथे भारतीय संघाने सिल्वर मेडल जिंकले होते. ब्राझीलमधील रिओ डी जेनेरो येथे 5 ऑगस्टपासून ऑलिंपिक सुरु होत आहे. 36 वर्षानंतर ऑलिंपिक खेळेल महिला टीम...
- हॉकी इंडिया (एचआई)चे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी मंगळवारी पुरुष आणि महिला टीमची घोषणा केली.
- पुरुष टीमचे उपकर्णधारपद एस व्ही सुनील याच्याकडे दिले आहे.
- 36 वर्षानंतर भारतीय महिला हॉकी टीमला ऑलिंपिकचे तिकीट मिळाले आहे.
- महिला हॉकी टीमचे कर्णधारपद सुशीला चानूकडे दिले आहे. उपकर्णधार दीपिका असेल.
- महिला हॉकीची कर्णधार रितूराणीने मागील आठवड्यात तडकाफडकी सराव कॅम्प सोडला होता. तिचीही संघातून उचलबांगडी करण्यात आली आहे.
6 देशांच्या हॉकी टूर्नामेंटमध्ये कर्णधार होता सरदार
- 27 जून, 2016 ला सुरु झालेल्या 6 देशांच्या हॉकी टूर्नामेंटसाठी सरदार सिंहला संघात स्थान देत कर्णधारपद दिले होते.
- यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला विश्रांती दिली होती. यात भारतीय टीमने सिल्वर मेडल जिंकले होते.
अशी आहे पुरुष हॉकी टीम-
हरमनप्रीत, रुपिंदर पाल, कोथाजीत सिंह, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंह, सरदार सिंह, वीआर रघुनाथ, एसके उथप्पा, पीआर श्रीजेश, दानिश मुजताबा, देवेंदर वाल्मीकि, एसवी सुनील, आकाशदीप सिंह, रमनदीप.
भारतीय महिला टीम:
गोलकीपर- सविता.
फॉरवर्ड: अनुराधा देवी थोचम, पूनम राणी, वंदना कटारिया, प्रीती दुबे, राणी रामंपाल,
मिडफिल्डर- नवज्योत कौर, मोनिका, रेणूका यादव, लिलिमा मिंझ, निकी प्रधान.
डिपेंन्डर- सुशीला चानू (कर्णधार), दीप ग्रेस ईक्का, दिपीका (उपकर्णधार), नमिता टोपो, सुनीता लाकरा
राखीव- रजनी इतिमारपू, एच लालरूथ फेली.
पुढे वाचा, 8 ऑलिंपिक गोल्‍ड मेडल जिंकणारी भारतीय पुरुष हॉकी टीम 1984 पासून खास प्रदर्शन करू शकलेली नाही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...