आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Lock Horns With Rampaging Afghanistan In SAFF Cup Final

फुटबाॅल : यजमान भारत सातव्या किताबासाठी सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - सहा वेळचा चॅम्पियन भारतीय संघ सातव्यांदा दक्षिण अाशियाई फेडरेशन फुटबाॅल स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. किताबासाठी रविवारी यजमान भारत अाणि अफगाणिस्तान टीम फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. अफगाणला अाता दुसऱ्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावण्याची अाशा अाहे. दुसरीकडे घरच्या मैदानावर फायनल जिंकून सातव्यांदा ही स्पर्धा अापल्या नावे करण्याचा यजमान भारताचा प्रयत्न असेल. त्यासाठी कर्णधार सुनील छेत्रीसह भारताचे अव्वल खेळाडू फाॅर्मात अाहेत. त्यामुळे हा सामना अधिक राेमांचक हाेण्याची शक्यता अाहे.

फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील लाजिरवाण्या पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाने सॅफची फायनल गाठली. या वेळी यजमान टीमने घरच्या मैदानावर सलग विजयाची माेहीम अबाधित ठेवत हा पल्ला यशस्वीपणे गाठला. तयजमान टीमच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत १५० व्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानने २०१३ मध्ये सॅफची फायनल जिंकली हाेती. अाता पुन्हा एकदा अंतिम सामन्यात बाजी मारून विजेतेपद अापल्या नावे करण्यासाठी अफगाणिस्तान टीम उत्सुक अाहे.

यजमानांचा दबदबा
जागतिक क्रमवारीत १६६ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने अातापर्यंत दहा वेळा फायनल गाठली अाहे. अाता ही फायनल जिंकण्याच्या इराद्याने यजमान टीम मैदानावर उतरेल. गतवर्षी फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला हाेता. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.