आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिया मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा पराभव, थायलंड सेमीफायनलमध्‍ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाे ची मिन्ह (व्हिएतनाम) - अाॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधू अाणि सायनाच्या अनुपस्थित खेळणाऱ्या भारतीय संघाला अाशिया मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. थायलंड टीमने शुक्रवारी भारतावर ३-२ अशा फरकाने मात केली. यासह भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. भारताला गत सामन्यामध्ये काेरियाने धूळ चारली हाेती. अाता थायलंडने अंतिम अाठमध्ये भारताला पराभूत केले. या विजयाच्या बळावर थायलंड संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  
 
भारताकडून मनू अत्री अाणि बी. सुमीत रेड्डीने दुहेरीच्या लढतीत विजय मिळवला. या जाेडीने किटिनुपाेंग-निपितफाेनचा पराभव केला. त्यांनी २१-१९, २१-१६ ने सामना जिंकला. त्यानंतर महिला एकेरीमध्ये ऋतुपर्णा दासला पराभवाचा सामना करावा लागला. तिला पाेर्नपावीने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...