आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RIO : भारतीय धावपटूंकडून निराशा !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - भारतीय धावपटूंनी ब्राझीलच्या रिअाे अाॅलिम्पिक ट्रॅकवर निराशेची धाव घेतली. त्यामुळे ट्रॅक अँड फील्डमध्ये समाधानकारक कामगिरीच्या भारतीय संघाच्या अाशा धुळीत मिळाल्या. यातील तिन्ही खेळ प्रकारांत भारताचे धावपटू सपशेल अपयशी ठरले.

यात भारताच्या पुरुष अाणि महिला रिले संघासह खुशबीर काैर, सपना पुनिया, संदीप कुमारचा समावेश अाहे. पुरुषांच्या ५० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत भारताचा संदीप ३५ व्या स्थानावर राहिला.

पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटरच्या रिलेत भारतीय संघ अपयशी ठरला. या संघाला पात्रतेच्या पहिल्या हिटमध्ये निराशेला सामाेरे जावे लागले. भारताचा पुरुष संघ सातव्या स्थानावर राहिला. या हिटमधील अव्वल तीन टीमला अंतिम फेरी गाठता अाली. भारताकडून माेहंमद अनास, पुथपुराणक्कल, अार्यसॅमी धारून अाणि राजीव अराेकिया यांनी नशीब अाजमावले. या टीमला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. संघाला चुकीच्या कामगिरीचा फटका बसला.

महिला संघ चमकला : गत महिन्यात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नाेंद करणारा भारतीय महिला संघ शनिवारी रिलेमध्ये चमकला. भारतीय महिला संघाने ४ बाय ४०० मीटर रिलेच्या दुसऱ्या हिटमध्ये सातवे स्थान गाठले. टीमने ३:२९.५३ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. मात्र, टीमला अव्वल तीनमध्ये स्थान मिळवता अाले नाही. परिणामी, भारतीय महिला संघ फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...