आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक कबड्डी : इंग्लंडचा धुव्वा; भारत उपांत्य फेरीत, ६९-१८ ने विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - दाेन वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाने मंगळवारी विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यजमान संघाने उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. भारताने ६९-१८ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला.
प्रदीप नारवाल (१३ गुण) अाणि अजय ठाकूर (११) यांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारताने सामना जिंकला. याशिवाय संघाच्या विजयात सुरजित (६) अाणि संदीप नारवाल (७) यांनीही माेलाचे याेगदान दिले. यासह भारताला अाव्हान कायम ठेवताना अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. इंग्लंडकडून साेमेश्वर कालियाने ७ गुणांची कमाई केली. मात्र, त्याला पराभव टाळता अाला नाही. भारताने दमदार सुरुवात करताना अाघाडी घेतली.

केनियाची अमेरिकेवर मात
केनियाने रंगतदार सामन्यात अमेरिकेवर मात केली. या टीमने ७४-१९ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...