आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी : मलेशियावर मात करत भारताने जिंकले कांस्यपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - येथे सुरू असलेल्या चार देशांच्या निमंत्रितांच्या स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने मलेशियाला ४-१ ने पराभूत करून कांस्यपदक पटकावले. भारताने आपल्या पहिल्या सामन्यातसुद्धा मलेशियाला हरवले होते. भारताने पुन्हा शानदार प्रदर्शन करताना ४-१ ने बाजी मारली. भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. आकाशदीप सिंगने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून स्कोअर १-० असा केला.

पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी घेताना दुसऱ्या हाफमध्येसुद्धा चांगले प्रदर्शन केले. भारताकडून सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला रघुनाथने पेनल्टी कॉर्नरवर शानदार प्रदर्शन करताना गोल करून स्कोअर २-० असा केला. काही सेकंदांनंतर मलेशियाने गोल करून स्कोअर २-१ असा केला. मात्र, ७ मिनिटांनी भारताकडून ५२ व्या मिनिटाला तलविंदर सिंगने गोल केला. रूपिंदरपाल सिंगने ५८ व्या मिनिटाला गोल करून स्कोअर ४-१ असा करून विजय निश्चित केला.
बातम्या आणखी आहेत...