आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलामीच्या पराभवानंतर 85 वर्षांत तीन वेळा टीम इंडियाची पुन्हा भरारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - पुण्यातील पराभव अाणि खेळपट्टीवरच्या वादावर पडदा टाकून अाता टीम इंडिया शनिवारपासून अाॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसाेटी खेळणार अाहे. बंगळुरूच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. अापल्या ८५ वर्षांच्या कसाेटी इतिहासामध्ये सलामीची कसाेटी गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका जिंकण्याचेही घवघवीत यश संपादन केले अाहे. त्यामुळे अाता दुसऱ्या कसाेटीमध्ये अाॅस्ट्रेलियाला धूळ चारून मालिकेमध्ये पुनरागमन करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. अाॅस्ट्रेलियाने सलामीची पुणे कसाेटी जिंकून मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली अाहे.

यापूर्वी १९७२ मध्ये इंग्लंडविरुद्ध, २००१ मध्ये अाॅस्ट्रेलिया व २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध सलामीच्या कसाेटीतील पराभवानंतरही भारताने मालिका अापल्या नावे केल्याची नाेंद अाहे. त्यामुळे अाता दुसऱ्या कसाेटीमध्ये काेहली ब्रिगेडवर सर्वांची नजर असेल. नंबर वन टीम इंडियाला सलामीच्या कसाेटीमध्ये अाॅस्ट्रेलियाने धूळ चारली. या पराभवामुळे भारताच्या सलग १९ कसाेटीतील विजयी माेहिमेला ब्रेक लागला. या सलामीला भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय यजमानांना सुमार खेळपट्टीमुळेही अनेक टीकांना सामाेरे जावे लागले.  
 
खेळपट्टीवरचे गवत काढले : कर्णधारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच काेहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सलामीच्या कसाेटीमध्ये प्रचंड दबावात हाेता. मात्र, अाता पुणे कसाेटीतील हे चित्र बंगळुरूच्या मैदानावर दिसणार नाही. कारण या ठिकाणच्या खेळपट्टीवरचे गवत हे दाेन दिवसांपूर्वीच काढण्यात अाले अाहे. निश्चितच ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदतगार असेल. त्यामुळे टीम इंडियामध्ये काहीसा बदल हाेण्याची शक्यता अाहे.   
 
हार्दिकला दुखापत : भारतीय संघाचा युवा गाेलंदाज हार्दिक पंड्या अद्यापही जखमी अाहे.  ताे खांद्याच्या दुखापतीमुळे बंगळुरू कसाेटीसाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे  भुवनेश्वरकुमारला संघामध्ये संधी मिळण्याची शक्यता अाहे. 

पुण्यासारखा गचाळ खेळ आमच्याकडून होणार नाही : काेहली
पुणे येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आम्ही खराब खेळलो हे मान्य करतो आणि यापुढे उर्वरित मालिकेत असा गचाळ, खराब खेळ आमच्याकडून होणार नाही याची हमी देतो, असे भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीने बंगळुरू येथील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी झालेल्या वार्तालापप्रसंगी सांगितले. पराभवाचे शल्य जिव्हारी लागले पाहिजे. त्यामुळे यापुढील कसोटीत आमच्याकडून झालेल्या चुका तुम्हाला पाहावयास मिळणार नाहीत, असे कोहली पुढे म्हणाला. ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम संघ आहे. त्यामुळे आम्ही या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध शिकण्याचा प्रयत्न करू हार्दिकचा खांदा दुखावला आहे, असेही काेहलीने सांगितले.

दोन्ही संभाव्य संघ असे
भारत : विराट काेहली (कर्णधार), मुरली विजय, लाेकेश राहुल, पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव/ करुण नायर.  
अाॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वाॅर्नर, मॅट रेनशाॅ, शाॅन मार्श, पीटर हँडसकाॅम्ब, मिशेल मार्श, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, स्टीव्ह अाेकिफे, नॅथन लाॅयन, जाेस हेजलवूड.
बातम्या आणखी आहेत...