आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • INDIA VS AUSTRALIA HOCKEY SERIES 2015: First Match Draw By 2 2

हॉकी : भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी २-२ ने ड्रॉ, कांगारूंनी विजय हिसकावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनांदगाव - अखेरच्या काही मिनिटांत खेळावरील पकड कमी होण्याची भारतीय हॉकी संघाची चूक या वेळीही ठळकपणे दिसून आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत भारताच्या या दुबळेपणाचा फायदा घेत सामना ड्रॉ केला. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला आघाडी घेतल्यानंतरसुद्धा भारताला विजय मिळवता आला नाही. सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना ५९ व्या मिनिटाला सिरियालोने पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून सामना २-२ ने बरोबरीत सोडवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत आता २२ नोव्हेंबर रोजी रायपूर येथे होईल.
नवव्या मिनिटाला डालन वादर्सपूनने मैदानी गोल करून ऑस्ट्रेलियाला १-० ने आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने आक्रमण वाढवले. १३ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर रूपिंदरपाल सिंगने गोल करण्याची संधी दवडली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने वर्चस्व राखले. २८ व्या मिनिटाला व्ही. आर. रघुनाथाने गोल करून स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांत चांगली झुंज रंगली. ४३ व्या मिनिटाला रघुनाथने पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांनी आक्रमण केले. सामना भारत जिंकेल असे वाटत असताना ५९ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर सिरियालोने गोल करून सामन्याचे चित्र बदलले.

रूपिंदरची चूक महागात
भारताला सामन्यात पाच पेनॉल्टी कॉर्नर मिळाले. यात रूपिंदरपाल सिंगला तीनपैकी एकावरही गोल करता आला नाही. दुसरीकडे रघुनाथने दोन्ही पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.