आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs New Zealand, Highlights, Kanpur Test Day 4: Black Caps 93 4 At Stumps

पहिली कसोटी: दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या ४ बाद ९३ धावा, टीम इंडियाला विजयाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोहित शर्मा (६८) आणि रवींद्र जडेजाच्या (५०) नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात ५ बाद ३७७ धावा काढल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३४ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची टीम ४ बाद ९३ धावा अशी संकटात सापडली होती. ऑफस्पिनर आर. अश्विनच्या तीन विकेटने पाहुण्या न्यूझीलंडची ही अवस्था केली. सोमवारी सामन्याचा शेवटचा दिवस असून, भारताला विजयासाठी ६ विकेटची गरज आहे.
भारताने कानूपर येथे सुरू असलेल्या ५०० व्या ऐतिहासिक कसोटीत मजबूत पकड मिळवली. चौथ्या दिवशीसुद्धा भारताने न्यूझीलंडवर दबदबा ठेवला. भारताने सकाळी १ बाद १५९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी मुरली विजय ६४ तर पुजारा ५० धावांवर खेळत होते. भारताला चौथ्या दिवशी पहिला धक्का विजयच्या रूपाने १८५ च्या स्कोअरवर बसला. मुरली विजयने पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. विजयने ७६ धावांचे योगदान दिले. त्याने १७० चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांसह ही खेळी केली. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो केवळ १८ धावा काढून मार्क क्रेगच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर थोड्या वेळाने पुजारासुद्धा ७८ धावा काढून सोढीच्या चेंडूवर बाद झाला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रहाणे ४० धावांवर असताना सँटनरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहाणे बाद झाला त्या वेळी भारताचा स्कोअर ५ बाद २७७ धावा असा होता. यानंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी वेगाने धावा काढताना १०० धावांची अभेद्य भागीदारी केली.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात गचाळ झाली. टॉम लँथम २, मार्टिन गुप्तिल ० आणि केन विल्यम्सन २५ यांना अश्विनने बाद केले. यासह अश्विनने कसोटीत २०० बळी पूर्ण केले. यानंतर रॉस टेलर १७ धावांवर उमेश यादवच्या थ्रोवर धावबाद झाला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ल्युक रोंची ३८ तर मिशेल सँटनर ८ धावांवर खेळत होते.
रोहितच्या १००० धावा
दरम्यान, रोहितने कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या. रोहित ६८ धावा काढून नाबाद राहिला. रवींद्र जडेजानेसुद्धा नाबाद ५० धावा काढल्या. जडेजाचे अर्धशतक पूर्ण होताच कोहलीने ५ बाद ३७७ धावांवर भारताचा डाव घोषित केला. रोहितने ९३ चेंडूंत ८ चौकारांसह ही खेळी केली. तर जडेजाने अवघ्या ५८ चेंडूंत ३ षटकार आणि २ चौकारांसह ५० धावा काढल्या.
धावफलक
भारत पहिला डाव ३१८. न्यूझिलंड पहिला डाव २६२

भारत दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
के.राहुल झे. टेलर गो. सोढी ३८ ५० ०८ ०
विजय पायचीत गो. सँटनर ७६ १७० ०८ १
पुजारा झे. टेलर गो. सोढी ७८ १५२ १० ०
कोहली झे. सोढी गो. क्रेग १८ ४० ०३ ०
रहाणे झे. टेलर गो. सँटनर ४० ८१ ०४ ०
रोहित शर्मा नाबाद ६८ ९३ ०८ ०
रवींद्र जडेजा नाबाद ५० ५८ ०२ ३
अवांतर : ९. एकूण : १०७.२ षटकांत ५ बाद ३७७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५२, २-१८५, ३-२१४, ४-२२८, ५-२७७. गोलंदाजी : बोल्ट ९-०-३४-०, सँटनर ३२.२-११-७९-२, मार्क क्रेग २३-३-०-१, वॅगनर १६-५-५२-०, ईश सोढी २०-२-९९-२,
गुप्तिल ४-०-१७-०, विल्यम्सन ३-०-७-०.

न्यूझीलंड दुसरा डाव (लक्ष्य ४३४) धावा चेंडू ४ ६
लँथम पायचित गो. अश्विन ०२ १५ ०० ०
गुप्तिल झे. विजय गो. अश्विन ०० ०५ ०० ०
विल्यम्सन पायचित गो. अश्विन २५ ५९ ०३ ०
रॉस टेलर धावबाद १७ ३६ ०२ ०
ल्युक रोंची नाबाद ३८ ५८ ०४ १
मिशेल सँटनर नाबाद ०८ ५० ०० ०
अवांतर : ३. एकूण : ३७ षटकांत ४ बाद ९३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२, २-३, ३-४३, ४-५६. गोलंदाजी : मो. शमी ४-२-६-०, अश्विन १६-१-६८-३, रवींद्र जडेजा १४-१०-८-०, उमेश यादव ३-०-९-०.
बातम्या आणखी आहेत...