आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक कबड्डी स्पर्धा; भारताला विजेतेपदाची अाशा, इराणविरुद्ध अाज फायनल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - दाेन वेळचा चॅम्पियन भारतीय संघ तिसऱ्यांदा कबड्डीचा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. गतविजेता भारत अाणि गत उपविजेता इराण यांच्यात शनिवारी फायनल रंगणार अाहे. भारताने शुक्रवारी धडाकेबाज विजयाच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. यजमान भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडवर ७३-२० ने मात केली.
प्रदीप नारवाल (१४ गुण) अाणि अजय ठाकूर (११) यांनी चुरशीची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. नितीन ताेमरनेही (७) संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

दुसरीकडे इराण संघाने सेमीफायनलमध्ये दक्षिण काेरियाचा पराभव केला. या संघाने २८-२२ ने राेमहर्षक विजयासह अंतिम फेरी गाठली. अनुप कुमारच्या नेतृत्वात यजमान भारताने फायनलपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला. दमदार खेळी करताना भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली. त्यामुळे चढाईपटूंच्या चुुरशीच्या खेळीने भारताला अाघाडी कायम ठेवता अाली. त्यामुुळे भारताने १८ मिनिटांत थायलंडला अाॅलअाऊट केले.
बातम्या आणखी आहेत...